Video : आसामच्या नागावमध्ये पूरजन्य परिस्थिती, बांबूच्या सहाय्याने महिलेचं रेस्क्यू

आसाममधील नागावमधील कांपूरच्या अनेक भागात पावसानंतर सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. अश्या परिस्थितीत एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एका महिलेला कळकावरून रेस्क्यु केल्याचं दिसत आहे.

Video : आसामच्या नागावमध्ये पूरजन्य परिस्थिती, बांबूच्या सहाय्याने महिलेचं रेस्क्यू
व्हायरल व्हीडिओImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 5:53 PM

मुंबई : सध्या जरी उन्हाळा सुरू असला तरी ईशान्य भारतात मात्र मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार पाऊस आणि भूस्खलन यामुळे आसाममध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आसाममधील (Assam) नागावमधील (Nagaon Flood) अनेक भागात पावसानंतर सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. अश्या परिस्थितीत एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एका महिलेला कळकावरून रेस्क्यु केल्याचं दिसत आहे. यात दोन पुरूष छाती इतक्या पाण्यातून या महिलेला घेऊन येताना दिसत आहेत. पाण्यातून बाहेर आणून तिला सोडतात. त्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल (Viral video) होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

आसाममधील नागावमधील कांपूरच्या अनेक भागात पावसानंतर सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. अश्या परिस्थितीत एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एका महिलेला कळकावरून रेस्क्यु केल्याचं दिसत आहे. यात दोन पुरूष छाती इतक्या पाण्यातून या महिलेला घेऊन येताना दिसत आहेत. पाण्यातून बाहेर आणून तिला सोडतात. त्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

आसाममधील लुमडिंग-बदरपूर डोंगरी भागात रुळांवर पाणी साचल्याने दोन दिवसांपासून अडकलेल्या दोन गाड्यांमधील सुमारे 2800 प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम हवाई दल आणि इतर यंत्रणांच्या मदतीने करण्यात आलं आहे. ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) च्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. शनिवारपासून संततधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत असल्याने हवाई दलाने अनेक प्रवाशांना बाहेर काढल्याचं त्यांनी सांगितलं. दिमा हासाओ जिल्ह्यातील NFR च्या लुमडिंग विभागात दोन गाड्या अडकल्या होत्या. हाफलांग महसूल विभागात भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि आसामच्या सात जिल्ह्यांमध्ये पुरामुळे 57 जण मरण पावले आहेत, अशी माहिती त्यांच्या वतीने देण्यात आली आहे.

बाधितांपैकी 4,330 लोकांना सरकारने स्थापन केलेल्या 20 मदत शिबिरांमध्ये ठेवण्यात आलं आहे. विविध बाधित जिल्ह्यांमध्ये नऊ मदत वितरण केंद्रे कार्यरत आहेत. सध्याच्या पूरस्थितीत एकूण 10,321 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. एनएफआरच्या प्रवक्त्याने गुवाहाटीमध्ये सांगितले की शनिवारपासून विभागातील सुमारे 18 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि प्रभावित क्षेत्रातील 10 हून अधिक गाड्या काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. संततधार पाऊस सुरू आहे. मात्र तरीही खराब झालेले रेल्वे रुळ दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.