Scott Morrison : ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींसाठी बनवली खास ‘गुजराती खिचडी’, कारणही आहे तितकंच खास…
Australia Prime Minister Scott Morrison : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी नरेंद्र मोदींसाठी विशेष गुजराती खिचडी बनवली. त्यामागे एक विशेष कारण आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) इतर देशांसोबत भारताचे संबंध अधिक वृद्धिगंत करण्यासाठी त्या देशांना भेटी देत असतात. ते काही व्यापारी करारही करताना पाहायला मिळतात. नुकतंच भारत (India) आणि ऑस्ट्रेलियात (Australia) एक व्यापारी करार झाला. त्याचा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Australia Prime Minister Scott Morrison) यांना विशेष आनंद झाला, तो आनंद त्यांनी भारतीय खिचडी खात साजरा केला. त्यामागे एक विशेष कारण आहे. पंतप्रधान मोदी गुजरातचे आहेत. खिचडी (Khichadi) हा तिथला प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे स्कॉट मॉरिसन यांनी खिचडी बनवतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
स्कॉट मॉरिसन यांचे ‘खिचडी’चे प्रयोग
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी खिचडी बनवली. त्यामागे कारणही तसंच आहे. नुकतंच भारत आणि ऑस्ट्रेलियात एक व्यापारी करार झाला. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी मॉरिसन यांनी खिचडी बनवली. त्याचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोला त्यांनी “भारतासोबत आमचा नवीन व्यापार करार झाला. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी मी खिचडी बनवली. माझे प्रिय मित्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये ही खिचडी आवडीने खाल्ली जाते. मोदी यांनाही खिचडी आवडते. त्यामुळे मी हा पदार्थ बनवला आहे”, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. दरम्यान, मॉरिसन यांनी याआधीही केरळची एक प्रसिद्ध डिश बनवली होती. त्याचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.
View this post on Instagram
भारत ऑस्ट्रेलियात कोणता करार?
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये नुकतंच ‘मुक्त व्यापार करार’ झाला आहे. ज्या अंतर्गत भारतातील 6 हजारांहून अधिक वस्तू ऑस्ट्रेलियाला शुल्कमुक्त निर्यात केल्या जाऊ शकतात. ऑस्ट्रेलिया आणि भारताचे संबंध जपण्यासाठी आणि अधिक मैत्रीपूर्ण होण्यासाठी हा करार महत्वपूर्ण आहे. भारतासोबतच्या मुक्त व्यापार कराराबद्दल स्कॉट मॉरिसन खूप आनंदी आहेत. मॉरिसन यांनी या कराराचा आनंद साजरा करत खिचडी बनवली आहे.
दरम्यान, चीनसोबत दोन हात करायचे असतील तर ऑस्ट्रेलियाला भारताच्या भूमीची गरज भासणार आहे. त्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियात मैत्रीपूर्ण संबंध असणं गरजेचं आहे.
संबंधित बातम्या