अवघ्या 20 वर्षात या खंडावर मुस्लिम शासन! अनेक शहरे ताब्यात, बहुसंख्याक समाज अल्पसंख्याक होणार, बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार?
Baba Vanga Prediction : जगात अनेक मोठ्या बदलाची नांदी दिसत आहे. सीरीया, यमन आणि इतर मुस्लिम राष्ट्रात कट्टरतावादी, दहशतवादी संघटना ISIS आणि तिची पिल्लावळ वाढल्याने अनेक मुस्लिम दुसऱ्या राष्ट्रात गेले. या खंडात मुस्लिम शासन येण्याची भविष्यावाणी बाबा वेंगाने अगोदरच वर्तवली आहे.

सीरीया, इराण, यमनसह अनेक मुस्लिम देशाना कट्टरतावाद्यांनी वेठीस धरले. त्यांच्या राजवटीत आपले आणि मुलांचे भविष्य सुरक्षित नसल्याने अनेक नागरिकांनी इतर देशात आश्रय घेतला. पण या नवीन पाहुण्यांमुळे या देशात अराजकतेची वेळ आली आहे. त्यांच्या सर्वच व्यवस्था, स्त्रोतावर बोजा वाढला आहे. या देशात या नवीन लोकसंख्याच नाही तर संस्कृतीने अतिक्रमण केल्याने स्थानिक लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना स्वाभाविकपणे वाढली आहे. तर दुसरीकडे या सर्व प्रगत राष्ट्रात अवघ्या 20 वर्षात मुस्लिम शासन येणार असल्याची भविष्यवाणी यापूर्वीच गूढ काव्यात केली होती. ही भविष्यवाणी खरी ठरणार का?
रशिया-चीनच्या तीन तुकड्या
नास्त्रेदमस नुसार, रशिया आणि चीन त्यांच्या सैन्याच्या तुकड्या करतील त्यांचे नाव बारबेरियन्स (वॅगनर), दि एक्जाइल (मिलिशिया) आणि रशिया-चीनचे अधिकृत लष्कर अशा तीन तुकड्या असतील. वॅगनर सैन्य युरोपातील अनेक देशांवर चढाई करेल. या युद्धात अमेरिका युरोपच्या मदतीला उतरेल. तर रशिया, चीन, इराण आणि इतर मुस्लिम देशांचा दुसरा गट असेल. याविषयी बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांची भविष्यवाणी जवळ जवळ एक सारखी आहे. या भविष्यवाणनुसार, 2043 पर्यंत युरोपमधील अनेक शहरांमध्ये मुस्लिम लोक बड्या पदावर असतील. त्यांच्या हातात या देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक नाड्या येतील. युरोपमध्ये मुस्लिम राजवट सुरू होईल.




जगावर पुन्हा साम्यवादाचे गारूड
एकीकडे धार्मिक झगडा सुरू होतानाच येत्या 50 ते 60 वर्षात पुन्हा जगावर साम्यवादाचे गारूड आरूढ होईल. 2076 मध्ये साम्यवादाची, कम्युनिस्टांची ताकद दिसून येईल. अनेक देशातील राजवट कम्युनिस्टांच्या हाती असेल. तिसर्या महायुद्धाची नांदी आतापासून सुरू झाल्याचा दावा बाबा वेंगाच्या भविष्यावाणीवरून करण्यात येतो. अर्थात यामध्ये किती सत्यता आहे हे येणारा काळच सांगेल. पण यापूर्वी तिच्या अनेक भविष्यवाण्या अचूक ठरल्याने तिच्या नावावर अनेक भाकीत खपवली जातात.
डिस्क्लेमर : या दाव्यांबद्दल पुरेशी आणि ठोस पुरावे किंवा अधिकृत दस्तावेज उपलब्ध नाही. बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.