VIDEO | गावात बिनधास्त फिरत होता सिंह , 4 कुत्र्यांनी मिळून त्याचा पाठलाग केला, पुढे काय घडलं पाहा व्हिडीओत
काही दिवसांपुर्वी सुशांत नंदा यांनी किंग कोबराचा घाबरवणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर सुध्दा नेटकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या. त्याचबरोबर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले होते.
मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हायरल व्हिडीओ (Animal Viral Video) अनेक लोकांना आवडतात. त्याचबरोबर काही व्हिडीओ वनअधिकाऱ्यांकडून शेअर केले जातात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ वन अधिकारी सुशांत नंदा (Indian Forest Service officer Susanta Nanda) यांनी शेअर केला आहे. त्यांनी या आगोदर सुध्दा अशा पद्धतीचे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) केले आहे. ते लोकांना अधिक आवडले सुध्दा आहेत. सध्या जो व्हिडीओ व्हायरल केला आहे, त्यामध्ये चार कुत्री एका सिंहाचा पाठलाग करीत आहेत. तो सिंह रात्रीचा गावातून फिरत आहे. त्यावेळी कुत्र्यांची मोठी झुंड सिंहाचा पाठलाग करीत आहे. त्यावेळी सिंह तिथून पळू लागतो. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ गुजरातमधील (lion in Gujarat)आहे.
आतापर्यंत 16 हजार लोकांनी पाहिलं…
हा व्हिडीओ काही तासांपुर्वी अपलोड केला आहे. त्या व्हिडीओला आतापर्यंत 16 हजार लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओ वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत. कमेंटमध्ये एका युझरने ‘सिंहापासून सुरक्षित अंतर राखणे शहाणपणाचे आहे, हे कुत्र्यांना चांगलेच ठाऊक आहे. आणखी एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, एकतामध्ये किती ताकद आहे. तिसऱ्या एका व्यक्तीने रस्त्यावरचा राजा आणि जंगलातील राजा अशी कमेंट केली आहे.
अपनी गली में तो कुत्ता भी शेर होता है??
From the streets of Gujarat. Via @surenmehra pic.twitter.com/clhYLlcq6C
— Susanta Nanda (@susantananda3) March 22, 2023
किंग कोबराचा घाबरवणारा एक व्हिडीओ शेअर…
काही दिवसांपुर्वी सुशांत नंदा यांनी किंग कोबराचा घाबरवणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर सुध्दा नेटकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या. त्याचबरोबर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले होते. त्याचबरोबर मोठी चर्चा देखील सोशल मीडियावर झाली होती. त्या व्हायरल केलेल्या व्हिडीओमध्ये एका किंग कोबरा एका स्थितीत दिसत होता. व्हिडिओमध्ये, एक मोठा किंग कोब्रा सरळ स्थितीत दिसत होता, त्याचे सापाचे डोके चिखलाच्या प्लॅटफॉर्मवरूनवर दिसत होते. जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक असलेल्या किंग कोब्राचाही सर्वात लांब विषारी सापांमध्ये समावेश होतो.