बेबी पांडा आणि मम्मी पांडाचा व्हिडीओ तुमचा दिवस बनवेल, गोंडस व्हिडीओ व्हायरल!
प्राण्यांचे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कुत्र्याचे व्हिडीओ, मांजराचे व्हिडीओ सगळ्यांनाच छान वाटतात. पण अजून काही व्हायरल होणारे प्राणी आहेत ज्याचे फोटो आणि व्हिडीओ कुणीच चुकवत नाही. सांगा कोणते? बेबी पांडा आणि बेबी एलिफंट. हो ना? या दोन प्राण्यांचे व्हिडीओ खूपच गोंडस असतात. हा व्हिडीओ बघा खूप गोंडस आहे.
मुंबई: आपण रोज कुठला ना कुठला व्हायरल झालेला बघतो. यात कधी लोकांचे डान्स असतात, कधी गाणे, तर कधी अजून काही. व्हायरल व्हिडीओ आवडला तर तो मोठ्या प्रमाणावर शेअर देखील केला जातो. प्राण्यांचे सुद्धा कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कुत्रे, मांजरं असे अनेक प्राणी यात असतात. प्राणीप्रेमी तर या अशा व्हिडीओंना अगदी डोक्यावर घेतात. कुत्र्याचे, मांजराचे व्हिडीओ यासह आणखी एक प्राणी आहे ज्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात. हा प्राणी ते पांडा! होय पांडाचे व्हिडीओ खूप लोकप्रिय आहेत.
क्युट व्हिडीओ
आता हा व्हिडीओ बघा. हा व्हिडीओ पांडा आई आणि पांडा बेबीचा आहे. बर्फाळ प्रदेशात हा पांडा आपल्या बाळाला घेऊन बसलाय. हा व्हिडीओ इतका क्युट आहे की तो खूप लोकांना आवडलाय. आधीच लोकांना प्राण्यांचं वेड त्यात जर आई आणि छोटंसं पिल्लू असेल तर, वाह क्या बात है! या व्हिडीओ मधली मम्मी पांडा आपल्या बेबी पांडाला गोंजारतीये. हा व्हिडीओ पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल.
व्हिडीओ पूर्ण बघा
Mother and child pic.twitter.com/WlxGSHChom
— Science girl (@gunsnrosesgirl3) September 26, 2023
व्हिडीओ भावुक करणारा
आपली आई सुद्धा आपल्याला लहानपणी गोंजारायची. आपलं प्रेमानं चुंबन घ्यायची. हा व्हिडीओ बघून प्रत्येकाला आपल्या आईची आठवण येईल. ही क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gunsnrosesgirl3 नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आलीये. व्हिडीओवर प्रचंड कमेंट्स आणि प्रतिक्रिया दिल्या जातायत. तुम्ही प्राण्यांचा कुठलाही व्हिडीओ शोधून बघा, सगळ्यात जास्त फेमस झालेला व्हिडीओ असुदेत किंवा आणखी काही ज्या-ज्या व्हिडीओमध्ये आई आणि मूल आहे तो व्हिडीओ भावुक करणारा आहे.