बस्स काय,आजोबा करतायत खरी पार्टी! व्हॉट ए कूल डूड, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!
या छोट्या व्हायरल क्लिपमध्ये बादशाहच्या 'अभी तो पार्टी शुरू हुई है' या सुपरहिट गाण्यावर लोक डान्स करताना दिसत आहेत. अचानक एका ८२ वर्षांच्या आजोबांवर कॅमेरा जातो आणि तो त्यांच्यावरच थांबतो.
वय म्हणजे फक्त एक संख्या! होय, माणूस मनाने तरुण आणि म्हातारा असतो. बॉलिवूडच्या सुपरहिट (Bollywood Superhit) गाण्यावर डान्स करणाऱ्या 82 वर्षीय वृद्धाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral)झाला आहे. खरं तर काला चष्मा असो किंवा भोजपुरी गाणं, डीजेवर वाजलं की तो माणूस म्हातारा असो किंवा तरुण… सगळ्यांचीच पावलं थिरकायला लागतात. डीजेवाल्यांनी (DJ) ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ गाणं लावलं आणि आजोबा नाचायला लागले ना. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल.
या छोट्या व्हायरल क्लिपमध्ये बादशाहच्या ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या सुपरहिट गाण्यावर लोक डान्स करताना दिसत आहेत. अचानक एका ८२ वर्षांच्या आजोबांवर कॅमेरा जातो आणि तो त्यांच्यावरच थांबतो.
आजोबांच्या डान्स स्टेप्स इतक्या अनोख्या आहेत की, त्यांची कॉपी करणं हे काही कुणाला जमणारं नाही कुणाचाच विषय नाही! याच कारणामुळे लोकांना ही क्लिप खूप आवडली आहे.
निगम पटेल (@Bigneegs) या इन्स्टाग्राम हँडलने शेअर केलेल्या या व्हिडिओला 40 हजाराहून अधिक लाईक्स आणि 1.1 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हायरल क्लिप
View this post on Instagram
आजोबांची एनर्जी लेव्हल पाहून शेकडो युझर्स हैराण झाले आहेत. अनेक युझर्सनी या व्हिडिओचं वर्णन डे-मेकिंग असं केलं तर काहींनी काकांनी काय डान्स केला आहे, असं लिहिलंय.
एका युझरने लिहिलं की, मी वर्कआऊट सुरू करणार आहे, जेणेकरून मी वयाच्या 82 व्या वर्षीही त्याच्यासारखा डान्स करू शकेन.