कमालच झाली, त्याने चक्क नेलकटरच गिळला आणि विसरुन गेला, आठ वर्षांनी मग काय घडले ?

तरुणाचा एक्सरे काढला तेव्हा डॉक्टरांना त्याचा पोटात एक नेटकटर आढळले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला याबाबत विचारले असता. त्याने सांगितलेली कहानी आश्चर्यकारक आहे.

कमालच झाली, त्याने चक्क नेलकटरच गिळला आणि विसरुन गेला, आठ वर्षांनी मग काय घडले ?
nail cutterImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 3:14 PM

बंगळुरु | 21 ऑगस्ट 2023 : काही लोकांना नखं खाण्याची सवय असते हे माहीती आहे. पण कोणी जर नेलकटर गिळलं असल्याचं कधी ऐकलंय का ? एका तरुणाने रागाच्या भरात चक्क नेलकटरच गिळला होता. त्याने याबद्दल कोणालाही चकार शब्दाने सांगितले नाही. त्यानंतर त्याला वाटले शौचामार्गे तो पडून गेला असावा, म्हणून ही बाब तो विसरुनच गेला. परंतू आठ वर्षांनतर त्याच्या पोटात अचानक दुखू लागल्याने त्याने डॉक्टरांनी भेट घेतली. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्यांना धक्काच बसला.

बंगळुरु येथील रमेश कुमार ( नाव बदलले आहे ) या 38 वर्षीय तरुणाच्या अचानक पोटात दुख लागल्याने त्याला मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाचा एक्सरे काढला तेव्हा डॉक्टरांना त्याचा पोटात एक नेटकटर आढळले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला याबाबत विचारले असता. तेव्हा त्याने सांगितले की तो 30 वर्षांचा असताना त्याच्या पालकांनी त्याला नशामुक्ती केंद्रात भरती केले होते. तेथे एकटेपणाला आणि पालकांच्या रागाने त्याने रागाच्या भरात नेलकटरच गिळले. त्यानंतर त्याने तेथील स्टाफला याबाबत सांगितले तेव्हा त्यांनी भरपूर केळी खा, म्हणजे तो शौचावाटे पडून जाईल असे सांगितले. त्यामुळे त्याला वाटले नेलकटर पडून गेला असेल, नंतर तो ही गोष्ट विसरुन गेला.

यामुळे आठ वर्षे नेलकटर आत सुरक्षित राहीले

रमेश कुमार पुनर्वसन केंद्रातून बाहेर आल्यानंतर सर्वसामान्य आयुष्य जगू लागला. त्याने ही गोष्ट पालकांना देखील सांगितली नाही. अनेक वर्षे त्याला काहीही त्रास झाला नसल्याने तो ही घटना विसरुन देखील गेला. बंगळुरु येथील हॉस्पिटलचे सर्जन डॉ. लोहीथ यांनी सांगितले की ही एकदम दुर्मिळ घटना आहे. हे रेग्यूलर साईजचे नेटकटर असून जनरली सर्वत्र वापरले जाते. याआधी रुग्णाच्या पोटावर दोन शस्त्रक्रिया झाल्या असल्याने, त्याच्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये एकप्रकारचा चिकटपणा आढळून आला त्यामुळे कदाचित आतड्यात नेल कटर सुरक्षित राहीले असावे असे वाटते असे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी अचूकपणे शस्रक्रिया करुन नेटकटर सुरक्षितपणे बाहेर काढले. तो जर एअरपोर्ट किंवा एमआरआय मशिन मधून गेला असता तर पोटात नेलकटर असल्याने कदाचित त्याला जखमा झाल्या असत्या असे डॉक्टरांनी सांगितले. नेलकटर जेव्हा पोटातून काढले तेव्हा ते खूप गंजले होते असेही डॉक्टरांनी सांगितले.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.