तणाव घालवण्यासाठी बाथ टब, सोबत बिअरची जोड, सुरु होण्याआधीच ‘गुड बिअर स्पा’ची चर्चा

बेल्जियममध्ये आगळा वेगळा स्पा सुरु होत आहे. येथे थेट बिअरमध्ये अंघोळ करता येणार आहे. (belgium brussels beer spa)

तणाव घालवण्यासाठी बाथ टब, सोबत बिअरची जोड, सुरु होण्याआधीच 'गुड बिअर स्पा'ची चर्चा
BEER SPA
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 12:25 AM

ब्रुसेल्स : कधी कोण कसं डोकं लावेल काही सांगता येत नाही. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे सगळेच तणावामध्ये जगत आहेत. त्यामुळे स्वत:ला तणावमुक्त ठेवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे पर्याय शोधतात. अनेकजण मद्यपान करुन तणामुक्त झाल्याचा अनुभव घेतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन ब्रुसेल्समध्ये आगळा वेगळा स्पा (beer spa) सुरु होत आहे. या स्पामध्ये थेट बिअरमध्ये अंघोळ करता येणार आहे. तसेच थेट नळाद्वारे हवी तेवढी बिअर पिता येणार आहे. (beer spa opens in Belgium Brussels people like idea)

बिअरचे खास मिश्रण

या बिअर स्पाची निर्मिती 45 वर्षीय Benedict Biebuyck आणि त्याची गर्लफ्रेंड Ana Bordonada यांनी केलीये. यामध्ये लोकांना बिअरमध्ये अंघोळ केल्यासारखा अनुभव घेता यावा म्हणून एक खास मिश्रण तयार केले आहे. यामद्ये त्यांनी हॉप, इस्ट, आणि मॉल्ट (hop, yeast and malt) हे बिरमध्ये मिसळले आहेत. या मिश्रणाचा अतिशय चांगला वास येत असून त्या वासामुळेसुद्धा अनेकजण या स्पाकडे आकर्षित होत आहेत.

बिअरमध्ये अंघोळ तसेच मनसोक्त बिअर प्या

बिअर शौकिनांसाठी एक आगळावेगळा स्पा सुरु करण्यात आला आहे. येते बिअरमध्ये स्पामध्ये बिअर ओतसलेल्या टबमध्ये तब्बल 45 मिनिटांसाठी बसता येईल . विशेष म्हणजे या बिअर स्पामध्ये बिअरच्या मिश्रणामध्ये बसून अंघोळीसारखा अनुभव घेता येईल. तसेच नळाद्वारे हवी तेवढी बिअरसुद्धा पिता येईल. हा स्पा येत्या 4 जून रोजी सुरु होणार आहे. मात्र, त्याआधीच या आगळ्यावेगळ्या बिअर स्पाची सगळीकडे चर्चा होत आहे.

लोकांना प्रयोग आवडला

गुड बिअर स्पाच्या प्रयोगाला प्रत्यक्ष सुरु करण्या अगोदर Benedict Biebuyck आणि Ana Bordonada यांनी त्यांच्या शेजाऱ्यांना या स्पाचा अनुभव घेण्याची विनंती केली. त्यांनंतर स्पामधील आरामदायी आणि सुगंधी बिअरबद्दल लोकांनी भरभरुन कौतुक केले आहे. “अशा प्रकारे बिअरमध्ये बसल्यानंतर तुमची त्वचा टवटवीत होते, असं मी ऐकलेलं आहे. या बिअर स्पामधील बिअरचे मिश्रण नैसर्गिक आणि अतिशय सुगंधी होते, हे सगळं काही खूप चांगलं होतं, असे एका 34 वर्षी महिला वेब डिझायनरने सांगितले.

इतर बातम्या :

Video | मित्राच्या पार्टीसाठी बालकनीत जमले, मध्येच घडला असा प्रकार की दोघे गंभीर जखमी, पाहा व्हिडीओ

Sexuality: लहान मुलांना लैंगिक शिक्षण कसे आणि केव्हा दिले पाहिजे?

VIDEO : नाकावर ऑक्सिजन, तरीही चेहऱ्यावर तेज, 95 वर्षांची कोरोनाबाधित आजी जेव्हा गरबा खेळते

(beer spa opens in Belgium Brussels people like idea)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.