Video | भूतानची छोटी मुलगी हात जोडून म्हणतेय Thank You भारत, व्हिडीओ बघून तुम्हीसुद्धा प्रेमात पडाल

आपला शेजारी देश भूतानलासुद्धा भारताने कोरोना लसचा पुरवठा केलेला आहे. याच पार्श्वभूमीवर भूतानमधील या छोट्याशा मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (bhutan little girl video corona vaccine)

Video |  भूतानची छोटी मुलगी हात जोडून म्हणतेय Thank You भारत, व्हिडीओ बघून तुम्हीसुद्धा प्रेमात पडाल
ही मुगली आपले दोन्ही हात जोडून भारत देशाचे आभार मानत आहे.
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 4:55 PM

थिंपू : जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिंबधक लसीकरण सुरु आहे. मात्र, काही देश गरीब असल्यामुळे किंवा त्या देशात कोरोना लस न पोहोचल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. ही गोष्ट लक्षात घेता भारत इतर अनेक देशांना लसीचा पुरवठा करतोय. आपला शेजारी देश भूतानलासुद्धा भारताने कोरोना लसीचा पुरवठा सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर भूतानमधील या छोट्याशा मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलीने आपल्या गोड आवाजात भारताचे आभार मानले आहेत. (Bhutan little girl thanking India for providing Corona vaccine video goes viral)

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

भूतानमधील भारताच्या राजदूत रुचिरा कंबोज यांनी एक व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भूतानची एक छोटी गोड मुलगी हिंदी आणि इंग्रजीमध्ये बोलत आहे. हिंदीमध्ये बोलण्यास सुरुवात करुन नंतर ती इंग्रजीमध्येसुद्धा बोलते. या मुलीचे नाव खेनरब येडझिन सिल्डेन (Khenrab Yeedzin Syelden) असून ती भारत सरकारचे आभार मानत आहे. भूतान देशाला कोरोना प्रतिबंधक लसी दिल्यामुळे ही मुलगी भारताचे आभार मानत आहे. या व्हिडीओच्या शेवटी ही छोटी मुलगी हिंदीमधून धन्यवाद भारत म्हणून भारताचे आभार मानते. #VaccineMaitri अभियानांतर्गत भारत सरकारने भूतानला लसीचा पुरवठा केला होता.

भूतानमधील छोट्या मुलीने भारताचे आभार मानले आहेत, पाहा व्हिडीओ :

दरम्यान राजदूत रुचिरा कंबोज यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात लाईक केलं जात आहे. आतापर्यंत या व्हिडीओल 10 हजार लोकांना पाहिलं असून अनेकांनी या व्हिडीओला रिट्विटसुद्धा केलं आहे. या छोट्या मुलीचं लडीवाळ बोलणं, दोन्ही हात जोडून भारताचे धन्यवाद माणणं अनेकांना चांगलंच आवडलं आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Viral Memes | नाकातून रक्त काढून दाखवा, स्वप्नील जोशी ते अण्णा नाईक, सेलिब्रिटींकडून ऐका त्यांचे आवडते मीम्स

VIDEO | विद्यार्थी UPSC ची तयारी कशी करतात?, IAS अधिकाऱ्याने शेअर केला मजेदार व्हिडीओ, तुम्हालाही येईल हसू

Nose Only Mask | फक्त नाकाला झाकणारा ‘हा’ मास्क ठऱतोय जगभरात चर्चेचा विषय, जाणून घ्या नेमके वैशिष्ट्य काय?

(Bhutan little girl thanking India for providing Corona vaccine video goes viral)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.