11 वेळा लस घेतल्याचा दावा! आधी लोक म्हणाले वाह वाह, आता खावी लागेल तुरुंगाची हवा?
एक दोन नाही, तर तब्बल अकरा वेळा कोविड प्रतिबंधक लस घेतल्याचा दावा एकानं केलाय. या दाव्यानंतर लोकांनी या इसमाची आधी वाह-वाह करत त्यावर मीम्स साकारले. आणि मग हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर पोलिसांनी हा अजब दावा करणाऱ्या इसमाची चांगलीच हवा काढलीये.
पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेचा कहर भारतानं अनुभवला. आता तिसरी लाट सुरु झाली आहे. संपूर्ण देशात कोरोना प्रतिबंधक नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. अशातच लसीकरणाला वेग आणला पाहिजे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारकडून राबवले जात आहेत. पण या सगळ्यातच एक व्यक्ती चांगलाच चर्चेत आलाय. एक दोन नाही, तर तब्बल अकरा वेळा कोविड प्रतिबंधक लस घेतल्याचा दावा एकानं केलाय. या दाव्यानंतर लोकांनी या इसमाची आधी वाह-वाह करत त्यावर मीम्स साकारले. आणि मग हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर पोलिसांनी हा अजब दावा करणाऱ्या इसमाची चांगलीच हवा काढलीये.
कोणंय हा लेजंड?
ज्या व्यक्तीनं कोरोना प्रतिबंधक लसीचे 11 डोस घेतल्याचा दावा केला आहे, तो आहे बिहारमधील. खरंतर हा एक डझन वेळ लस घेणार होता. 11 वेळा घेऊनी झाला. पण बाराव्या वेळेला पकडला गेलाय. डझनचा कोटा पूर्ण करण्यावेळीच हा भांडाफोड झाला आहे.
मटकीला मोड नाय, क्रिएटीव्हिटीला तोड नाय!
एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार ब्रम्हदेव मंडल यांनी दावा केलाय की त्यांनी तब्बल अकरावेळा कोरोना लस घेतली. जेव्हापासून त्यांनी लस घ्यायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून ते कधीच आजारी पडलेले नाहीत. इतकंच काय तर त्यांची प्रकृतीती सुधारल्याचा दावा ब्रम्हदेव मंडल यांनी केलंय. त्यांच्या या दाव्यामुळे सोशल मीडियातील लोकांनी आपली क्रिएटीव्हीटी पणाला लावत मीम्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
एकानं म्हटलं की, वॅक्सीन घ्यायला आला होता, की लग्नातलं आयस्क्रिम? खरंच आहे, लग्नातल्या आईस्क्रिमवर ताव मारावा तसा ब्रम्हदेव यांनी लसीवर ताव मारल्याचा टोला एका युजरनं लगावला आहे.
तर काहींनी याप्रकरणी उलट बिहार पोलिसांवरच निशाणा साधलाय. ज्यांनी इतक्या वेळी ब्रम्हदेव यांनी लस दिली त्यांना पकडायचं सोडून पोलीस ब्रम्हदेव यांच्यावर कारवाई करत असल्यानं काहींनी आश्चर्य व्यक्त केलंय. तर काहींनी फुकट मिळालेल्या गोष्टी पौष्टीक असल्याचं म्हणत विनोद केलाय. दरम्यान, काहींनी मिम्स बनवत ब्रम्हदेव यांची खिल्ली उडवली आहे.
Bihar | Police lodged an FIR against Brahamdev Mandal for claiming that he has taken 11 doses of the Covid vaccine. Primary Health Care (PHC) Puraini had registered a complaint against Brahamdev Mandal. The investigation is underway: Puraini SHO https://t.co/sEL3ol2FPW
— ANI (@ANI) January 9, 2022
Vaccine dose samjha yaa function mai ice cream jo itne baar le liya ?
— Prabhas (@_Prabhas__) January 9, 2022
* बिहार के ब्रहमदेव मंडल वैक्सीन की 11 डोस लगवाने के बाद * pic.twitter.com/4FbsCTbdKe
— ShaiL (@maukaterian) January 6, 2022
— Dr. Gill 2022 (@ikpsgill1) January 6, 2022
Body main Khoon nahi Vaccine hi vaccine hai. 1 unit vaccine niklwa Lo chacha !!
— TOO MUCH DEMOCRACY (@L0ST_IN_CINEMA) January 6, 2022
इतर बातम्या –
Corona Update : मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा घसरला पण चिंता कायम, तर पुण्यात मोठी रुग्णवाढ