Video: स्कूटीवाल्या महिलेचा हाय व्होल्टेज ड्रामा, मास्क घातलाय हेल्मेट घालणार नाही, पोलिसांवरच भडकली

पाटणामध्ये बोरिंग रोडवरील एका चौकात बुधवारी रात्री पोलीस आणि महिला यांच्या हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. Patna Boring Road woman high voltage drama

Video: स्कूटीवाल्या महिलेचा हाय व्होल्टेज ड्रामा, मास्क घातलाय हेल्मेट घालणार नाही, पोलिसांवरच भडकली
Bihar Patna Woman Drama
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 11:44 AM

पाटणा: बिहारची राजधानी पाटणामध्ये बोरिंग रोडवरील एका चौकात बुधवारी रात्री पोलीस आणि महिला यांच्या हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. विना हेल्मेट स्कूटी चालवत असल्यानं पोलिसांनी महिलेला थांबवलं. हेल्मेट नसल्यानं दंड भरावा लागेल, असं पोलिसांनी सांगितल्यावर त्या महिलेचा पारा चढला. संबंधित महिलेनं पोलीस, रुग्णालय, कोरोना, लॉकडाऊन या मुद्यावरुन आरडाओरडा सुरु केला. तर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील तिनं खडे बोल सुनावले. मी मास्क घातलाय तर हेल्मेट सक्ती का करताय, असा सवाल तिनं पोलिसांनी केला. (Bihar Patna Boring Road woman high voltage drama for not wearing helmet with Police)

नेमकं काय घडलं?

पाटणा शहरातील बोरिंग रोड चौकात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. त्या दरम्यान एक महिला हेल्मेट न घालता स्कूटी चालवत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्या महिलेला थांबवलं. महिलेला पोलिसांनी अडवल्यामुळे तिचा पारा चढला तिनं पोलिसांवरचं तोंडसुख घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तिला दंड भरावा लागेल, असं समजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला कोणतीही गोष्ट ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती.

मनात येते त्यावेळेस लॉकडाऊन

पोलिसांशी वाद घालणारी महिला स्कुटीचा पास बनवण्यासाठी बाहेर पडल्याचा दावा करते. रिक्षावाले, सामान्य लोक अन्नाविना मरत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या मनात येईल तेव्हा लॉकडाऊन लावतात. नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार रिक्षावाले यांच्यासाठी काही करत नाहीत. मी त्यांच्यासाठी काम करतेय. गेल्या लॉकडाऊनमध्येही केलं होतं, असं त्या महिलेनं म्हटलं.

पत्रकारांना सुनावलं

महिला आणि पोलिसांच्यांमधील वादाचं चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांकडे मोर्चा वळवला. गरिबीमुळं भूकेनं मरणाऱ्या लोकांचे व्हिडीओ बनवा, असं त्या महिलेने पत्रकाराला सुनावलं. मागच्या वर्षी आणि यावर्षी अन्न वाटप केलं आहे या वर्षीही वाटणार आहे. माझा व्हिडीओ का बनवताय, नितीशकुमार आणि नरेंद्र मोदींचा व्हिडीओ बनवा, असं तिनं सुनावलं.

संबंधित बातम्या:

VIDEO | सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं… डोक्यावर पदर सावरत गाणाऱ्या आजींचा गोड व्हिडीओ पाहिलात?

Video | इंजेक्शनची सुई पाहून तरुणीला फुटला घाम, नंतर जे घडलं ते एकदा पाहाच !

(Bihar Patna Boring Road woman high voltage drama for not wearing helmet with Police)

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.