VIDEO | प्रेयसीसोबत स्टंटबाजी करत होता तरुण, पुढचं चाक हवेत उंचावून बाईक चालवली, पुढे काय झालं व्हिडीओत पाहा
सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तरुण प्रेयसीसोबत स्टंटबाजी करत होता. हा व्हिडीओ दिल्ली पोलिसांकडे गेल्यानंतर त्यांनी एक सल्ला दिला आहे.
मुंबई : बाईक चालवताना तरुण प्रेयसीसोबत स्टंटबाजी (bike stunt) करत होता. त्याचा व्हिडीओ दिल्ली पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी तो ट्विटच्या (twitter video) माध्यमातून लोकांच्यासमोर आणला आहे. तो व्हिडीओ शेअर करीत असताना त्यांनी लोकांना आणि तरुणाला एक सल्ला दिला आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ज्यावेळी ट्विट शेअर केले आहे. त्यावेळी त्यांनी म्हटले आहे की, सुरक्षित गाडी (trending video) चालवण्याचा सल्ला दिला आहे.
28 सेकंदाचा तो व्हिडीओ
28 सेकंदाचा तो व्हिडीओ आहे. एक जोडपं त्यावरती खतरनाक स्टंट करीत असताना दिसत आहे. त्याचा परिणाम सुध्दा अधिक भयानक झाला आहे. मुलगा आणि मुलगी जोराची पडली आहे. दिल्ली पोलिसांनी तो व्हिडीओ शेअर केला, त्यावेळी एक कॅप्शन लिहीलं आहे. त्यामध्ये त्यांनी जब वी मेट चित्रपटातील गाणे लावले आहे. त्या गाण्यामध्ये “ये रिस्क हाए, बैठे बिठाए, हड्डियां तुड़वाए.”
JAB WE MET with an accident due to reckless driving.#DriveSafe@dtptraffic pic.twitter.com/adfwIPtHlX
— Delhi Police (@DelhiPolice) June 28, 2023
व्हिडीओला खूप साऱ्या कमेंट
दिल्ली पोलिसांनी शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहीलं आहे. ज्यावेळी आम्ही कशाही पद्धतीने गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी अपघात होण्याची अधिक शक्यता असते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी त्या व्हिडीओला खूप साऱ्या कमेंट केल्या आहेत. यापूर्वी सोशल मीडियावर दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी अधिक व्हिडीओ व्हायरल केले आहेत.
सोशल मीडियावरती कधी काय व्हायरल होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आतापर्यंत अनेक गोष्टी व्हायरल झाल्या आहेत. त्यामध्ये काही गोष्टी चांगल्या आहे, तर काही गोष्टी वाईट आहेत.