AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Biker Stunt Video Viral : हुक्की आली म्हणून स्टंटबाजी केली अन् असाकाही आपटला, की…

नेक वेळा लोक असे स्टंट (Stunt) करतात, ज्यामुळे त्यांचा जीव जातो. यामुळेच एखाद्या प्रशिक्षित व्यक्तीने असे स्टंट केले तर बरे. या प्रकारामध्ये एका मुलाचा बाइक (Bike) स्टंट करतानाचा व्हिडिओ (Video)सोशल मीडिया(Social Media)वर समोर आला आहे, ज्यामध्ये मुलगा रस्त्यावर समोरासमोर पडतो.

Biker Stunt Video Viral : हुक्की आली म्हणून स्टंटबाजी केली अन् असाकाही आपटला, की...
स्टंट करताना आपटला दुचाकीस्वार
| Updated on: Feb 02, 2022 | 4:42 PM
Share

Bike Stunt Video : तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर तुम्ही त्याच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा जास्त स्टंट व्हिडिओ पाहिले असतील. अनेक वेळा लोक असे स्टंट (Stunt) करतात, ज्यामुळे त्यांचा जीव जातो. यामुळेच एखाद्या प्रशिक्षित व्यक्तीने असे स्टंट केले तर बरे. या प्रकारामध्ये एका मुलाचा बाइक (Bike) स्टंट करतानाचा व्हिडिओ (Video)सोशल मीडिया(Social Media)वर समोर आला आहे, ज्यामध्ये मुलगा रस्त्यावर समोरासमोर पडतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आधी तुम्हाला त्या मुलाची कीव येईल, मग तुम्ही पण म्हणाल, काय, निघाली ना सगळी हिरोगिरी! सोशल मीडियाच्या विश्वात लोकप्रिय होण्यासाठी लोक काय करतात? काही लोक काही वेळा हेडलाइन्स मिळवण्याच्या हेतूने असे करतात, ज्यामुळे त्यांचा जीव जातो. विशेषत: स्टंट व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच पाहायला मिळेल.

स्टंट करताना घडतं असं काही…

मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. व्हिडिओमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे बांधलेली दिसत आहेत. यादरम्यान एक कार तिथून जात आहे. लोकांनी घराबाहेर वाहने उभी केलेली पाहायला मिळतात. यादरम्यान एक दुचाकीस्वार वेगात स्टंट करत तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर जे काही होते ते तुम्हीच पाहा या व्हिडिओमध्ये.

टायरेसने इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ

या बाइक स्टंटचा व्हिडिओ हॉलिवूड अभिनेता टायरेसने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. काही तासांपूर्वी अपलोड झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जास्त पाहिला जात आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 16 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी काहींनी या मुलाबद्दल चिंता व्यक्त केली आहे, तर काहींनी याला मूर्ख असल्याचे म्हटले आहे.

मुलाला ‘लक्ष्य’

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट करत लिहिले, की भावा, मी दाव्याने सांगतो, की त्याचे पाय मोडले असावेत.’ त्याचवेळी दुसऱ्या एका यूझरने फास्ट अँड फ्युरियस या चित्रपटाचा हवाला देत या मुलासोबत असे म्हटले आहे, की खेळ पूर्ण झाला. दुसर्‍या यूझरचे म्हणणे आहे, की हे कोणत्याही बाजूने बुद्धिमत्तेने केलेले कृत्य नाही. मुलाला त्याच्या मूर्खपणाची शिक्षा झाली आहे. एकंदरीत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक यूझर्स त्या मुलाला खूप काही सांगत आहेत.

View this post on Instagram

A post shared by TYRESE (@tyrese)

Viral Photos : पर्यटकांना आकर्षित करणारं हे ‘उलटं घर’ नेमकं आहे तरी कुठं? चला, जाणून घेऊ

कितने तेजस्वी लोग हैं! Escalatorवर उलटं पळणारे हे तरूण पाहा, प्रवाहाविरूद्ध चालणं यालाच म्हणतात!

Video : Union Budgetनंतर युवकानं सायकलचं हे असं काय केलं? हर्ष गोयंकांचं मजेशीर ट्विट होतंय Viral

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.