Viral : ‘हा’ फोटो काढायला लागली तब्बल दोन वर्ष! यूझर्स म्हणतायत, ‘फोटोग्राफरच्या शानदार समर्पणाला सलाम..’
Black Leapord Photo & Video : सोशल मीडियावर वन्य प्राण्यां(Animals)शी संबंधित छायाचित्रे (Photos) तसेच व्हिडिओ (Videos) व्हायरल होत आहेत. आता वन्यजीव छायाचित्रकारा(Wildlife photographers)ने काढलेल्या काळ्या बिबट्याचा फोटो व्हायरल होत आहे.
Black Leapord Photo & Video : सोशल मीडियावर वन्य प्राण्यां(Animals)शी संबंधित छायाचित्रे (Photos) तसेच व्हिडिओ (Videos) व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये कधी कधी प्राणी असे कृत्य करतात, जे पाहिल्यानंतर अनेकवेळा आपण हसतो, तर अनेकवेळा आपल्याला असे काही पाहायला मिळते ज्यामुळे आपला थरकापही उडतो. याचे कारण हे देखील आहे की वनजीवन खूप वेगळे आहे. अशा परिस्थितीत हे जीवन जगासमोर आणण्याचे काम करतात वन्यजीव छायाचित्रकार (Wildlife photographers). तुम्ही या छायाचित्रकारांची तुलना सामान्य छायाचित्रकाराशी करू शकत नाही. कारण वन्यजीव छायाचित्रकार असाच होऊ शकतो जो निसर्ग आणि प्राण्यांवर प्रेम करतो आणि घनदाट जंगलात जाऊन भयानक प्राणी आपल्या कॅमेऱ्यात टिपू शकतो. असाच काहीसा प्रकार अलीकडे समोर आला आहे. ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. बिबट्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. सध्या सोशल मीडियावर काळ्या बिबट्याचे छायाचित्र, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ट्विटर, इन्स्टावर शेअर
व्हायरल झालेले छायाचित्र टिपण्यासाठी फोटोग्राफरला दोन वर्षे मेहनत घ्यावी लागली. हा प्राणी लाजाळू प्राणी असला तरी त्यामुळे छायाचित्रकाराला हे छायाचित्र टिपण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. @mikeerichards नावाच्या अकाऊंटवरून हे छायाचित्र ट्विटरवर शेअर करण्यात आले आहे. शेकडो लाइक्स आणि रिट्विट्स या फोटोला मिळाले आहेत. त्यासोबत त्याने कॅप्शन लिहिले, की हा फोटो फोटोग्राफर अनुराग गावंडे यांनी टिपला आहे. यावेळी तो या बिबट्यापासून फक्त 30 फूट अंतरावर होता. ही छायाचित्रे त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत. ही छायाचित्रे महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील आहेत.
BLACK LEOPARD
Photographer Anurag Gawande waited for 2 years for the opportunity to capture a rare black leopard on camera as it crossed a road in Tadoba National Park in Maharashtra, India. He commented that under most light conditions you don’t see any spots. pic.twitter.com/vO4GiIIf8z
— Michael E.Richards (@mikeerichards) February 7, 2022
फोटोंना पसंती
सोशल मीडिया यूझर्सनी या फोटोला पसंती दिली आहे. लोक या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूझरने लिहिले, ‘फोटोग्राफरच्या शानदार समर्पणाला सलाम..’, तर दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘त्याचे सौंदर्य जंगलातील इतर प्राण्यांपेक्षा वेगळे बनवते.’ दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘या दुर्मीळ प्राण्याचे खरे फोटो काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.” याशिवाय इतर अनेक यूझर्सनी आपल्या कमेंट्सद्वारे हे ठेवले आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा :