Amazing Skating Video : स्केटिंगही आणि स्टंटही! पण तुम्हाला माहितीये का ‘ही’ व्यक्ती पाहूही शकत नाही

तुम्ही अशा अनेक लोकांबद्दल ऐकलं असेल, जे अंध (Blind) आहेत, म्हणजेच ते पाहू शकत नाहीत, परंतु त्यांच्या धैर्यानं ते आयुष्यातला प्रत्येक टप्पा गाठतात. अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होतोय, जो अंध आहे, पण आपल्या स्वप्नांच्या आड आपलं अंधत्व येऊ दिलं नाही. त्यानं जे काही केलं ते दृष्टी असणारेही करू शकणार नाहीत.

Amazing Skating Video : स्केटिंगही आणि स्टंटही! पण तुम्हाला माहितीये का 'ही' व्यक्ती पाहूही शकत नाही
स्केटिंग करणारी अंध व्यक्ती
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 11:55 AM

Blind Man Skating Video : असं म्हणतात की मनात विश्वास आणि धैर्य असेल तर माणूस आयुष्यात प्रत्येक संकटावर मात करतो, म्हणजेच जीवनात यश मिळवण्यासाठी धैर्य असणं आवश्यक आहे. प्रोत्साहनामुळे आपल्यातली शक्ती वाढते आणि ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा मिळते. तुम्ही अशा अनेक लोकांबद्दल ऐकलं असेल, जे अंध (Blind) आहेत, म्हणजेच ते पाहू शकत नाहीत, परंतु त्यांच्या धैर्यानं ते आयुष्यातला प्रत्येक टप्पा गाठतात. अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होतोय, जो अंध आहे, पण आपल्या स्वप्नांच्या आड आपलं अंधत्व येऊ दिलं नाही. त्यानं जे काही केलं ते दृष्टी असणारेही करू शकणार नाहीत. असा हा हिंमत असणारा, जिद्दीच्या जोरावर सर्वांची मनं जिंकून घेत आहे. तो जे काही करतोय ते अत्यंत प्रेरणादायीही आहे, असं अनेकांनी म्हटलंय. म्हणजेच दृष्टी असणारेही त्याच्याइतकं कौशल्यानं असा खेळ खेळू शकतील, असं वाटत नाही. खेळ करतोय आणि स्टंट(Stunt)ही.

अप्रतिम स्टंट

तुम्ही लोकांना स्केटिंग (Skating) करताना पाहिलं असेल. ते शिकणं इतकं सोपं नाही. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, पण तुम्ही क्वचितच एखादी अंध व्यक्ती स्केटिंग करताना पाहिली असेल. असाच काहीसा प्रकार व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक अंध व्यक्ती स्केटिंग करताना अप्रतिम स्टंट करताना दिसत आहे. यादरम्यान, त्यानं हातात एक काठीदेखील धरली आहे, ज्याच्या मदतीनं तो पुढचा रस्ता ओळखू शकतोय आणि स्केटिंग करत आहे.

ट्विटर हँडलवर शेअर

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा अप्रतिम व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलय, दिसत नाही. पण नशीब त्याला स्केटबोर्डिंग करण्यापासून रोखू शकलं नाही. आयुष्यातून जे हवंय त्यासाठी इतकं झगडावं की नशिबानंही गुडघे टेकावेत.

अद्भुत…

1 मिनिट 20 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 11 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलं आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय, की अद्भुत कला प्रदर्शन, तर इतर अनेक यूझर्सनी व्हिडिओ अतिशय नेत्रदीपक आणि अद्भुत असल्याचं म्हटलंय. तसंच त्या दिव्यांग व्यक्तीच्या धैर्याला सलामदेखील केलाय.

Cutest Band : एकापेक्षा एक… चिमुल्यांचा असा Cute बँड पाहिला नसेल, सोशल मीडियावर मिळवतायत वाहवा!

Video : दहा वर्षाच्या जलपरीचा अनोखा विक्रम, काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवरून प्रवास

Viral : दोन इमारतींवरून कशी मारली उडी? Videoमध्ये पाहा excellent Jump

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.