या निळ्या टोपणाच्या पेनाचे प्रोडक्शन खरोखरच बंद झाले ? लोक झाले प्रचंड निराश, कंपनीने केला खुलासा

आपल्या शालेय जीवनात नव्वदच्या दशकांत आपण रेनॉल्ड्सचे हे पांढरा आणि निळ्या रंगाचा हा पेन नक्कीच वापरला असेल, हा पेन बंद होणार असल्याचे वृत्त समाजमाध्यमावर पसरले आहे. त्यासंदर्भात कंपनीने खुलासा केला आहे.

या निळ्या टोपणाच्या पेनाचे प्रोडक्शन खरोखरच बंद झाले ? लोक झाले प्रचंड निराश, कंपनीने केला खुलासा
reynolds penImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 1:09 PM

नवी दिल्ली | 10 सप्टेंबर 2023 : नव्वदच्या दशकात अनेकांना त्यांच्या शालेय किंवा कॉलेज जीवनात या निळ्या झाकणाच्या पांढऱ्या रंगाच्या प्लास्टीक पेनाची आठवण नक्कीच असणार, हा पेन मार्केटमध्ये लॉंच होताच त्याला विद्यार्थ्यांकडून एवढे पसंद केले गेले की अनेकांकडे हा पेन हटकून असायचाच. अनेकांनी या पेनाने सुंदर अक्षर येत असल्याने आपले परीक्षेचे पेपर देखील सोडवले असतील. त्यामुळे सर्वांचा आवडता असलेला या पेनच्या संदर्भात आलेल्या एका बातमीने अनेकांना आपले शाळा आणि कॉलेजचे जीवन आठवले आणि अनेकजण भावनिक झाले आहेत.

सोशल साईट ट्वीटर ( एक्स ) या रेनॉल्ड पेन संदर्भातील एक पोस्ट व्हायरल झाली आहे. 90s Kid नावाच्या एका ट्वीटर हॅंडलने या पेनाच्या बाबतीत एक दावा केलाय की रेनॉल्ड्स 045 fine Carbure पेन आता मार्केटमध्ये मिळणार नाही. या पोस्टनंतर लिहीलंय की हा एकाचा युगाचा अंत आहे. त्यानंतर हार्ट ब्रोकचा इमोजीही टाकला आहे. या पोस्टला पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रीया दिली आहे. ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. 27 लाख लोकांनी ही पोस्ट पाहीली आहे. या पेनचा आपल्या विद्यार्थी दशेत चाहत्या असलेल्यांनी त्यावर भावनिक प्रतिक्रीयाही दिल्या आहेत. तसेच अनेकांनी बल्कमध्ये ऑर्डरही नोंदविल्या आहेत.

हीच ती पोस्ट ज्याने चर्चा सुरु झाली –

कंपनीची काय प्रतिक्रीया

रेनॉल्डस पेनची ही व्हायरल पोस्ट या पेनाच्या कंपनीपर्यंत पोहचली. कंपनीने यासंदर्भात लागलीच खुलासा केला आहे. या कंपनीने समाजमाध्यम ट्वीटरवर ( एक्स ) पोस्ट करीत म्हटले आहे की पेना संदर्भात फेसबुक आणि इतर समाजमाध्यमावर सुरु असलेल्या चर्चा आणि पोस्ट चुकीच्या आहे. कंपनीचे पार्टनर, स्टेकहोल्डर्स आणि कस्टमर यांनी कंपनी संदर्भातील माहीती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर पाहाव्यात. सर्वाचा विश्वास कायम ठेवणे ही कंपनीची जबाबदारी आहे. या आयकॉनिक पेनाचे उत्पादन बंद करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय कंपनीने घेतलेला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.