Funny Video viral : ‘जय महाराष्ट्र, हरहर महादेव, जय बजरंग बली, काका, काकू, मामा, मामी…; पाळण्यात बसल्यावर मुलाला हे काय झालं?
Kid funny video : अनेकदा मुले जत्रेत किंवा एखाद्या अॅम्यूझमेंट पार्कमध्ये (Amusement park) गेल्यावर त्यांचे लक्ष सर्वात आधी मोठमोठ्या पाळण्याकडे, झुल्याकडे (Swing) जाते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) समोर आला आहे. तो पाहून तुम्हाला हसू येईल.
Kid funny video : अनेकदा मुले जत्रेत किंवा एखाद्या अॅम्यूझमेंट पार्कमध्ये (Amusement park) गेल्यावर त्यांचे लक्ष सर्वात आधी मोठमोठ्या पाळण्याकडे, झुल्याकडे (Swing) जाते. आजही जत्रेत गेल्यावर आपले लक्ष सर्वात आधी त्याच पाळण्यांकडे जाते, जे पाहून बालपणीच्या आठवणी ताज्या होतात, यात शंका नाही. ज्यावर बसायच्या आधी मोठमोठे स्वॅग दाखवायचो पण जेव्हा जेव्हा स्विंग व्हायला सुरुवात होते तेव्हा कशी परिस्थिती होते, हे सर्वांनाच माहीत आहे. अलीकडच्या काळात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) समोर आला आहे. हे पाहिल्यानंतर तुमच्या बालपणीच्या आठवणी नक्कीच ताज्या होतील. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. व्हिडिओमध्ये एक मुलगा एका पाळण्यात बसलाय. तो सुरू होईपर्यंत तर मुलगा एकदम उत्साहात असतो. त्याचा स्वॅग पाहण्यासारखा असतो. मात्र जसजसा पाळणा फिरायला लागतो तसा मुलगा घाबरतो.
पोटात येतो गोळा
पाळणा वर-खाली होतो तेव्हा त्याच्या पोटातही गोळा यायला लागतो. घाबरलेल्या अवस्थेत तो प्रार्थना करतो आणि परमेश्वराच्या नावाचा जयघोष करतो. ‘जय महाराष्ट्र! हरहर महादेव, जय बजरंग बली, म्हणताना आपल्याला दिसून येते.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर शेअर
एक एक करून मुलाला घरातल्या सर्व लोकांची आठवण येऊ लागते. “पप्पा, मामा, काका, काकी” अशा सर्वांची नावे तो घेतो. समोर बसलेला व्यक्ती मोबाइलवरून संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो. जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा मजेदार व्हिडिओ GiDDa CoMpAnY नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हसू आवरणार नाही
व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरने लिहिले, की मला एकाच वेळी सर्व कुटुंबे आणि देवाची नावे आठवली.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘हा मजेशीर व्हिडिओ पाहिल्यानंतर मला उतरलेल्या भावाची आठवण झाली.’ याशिवाय इतर अनेक यूझर्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.