Viral : ब्राझीलमध्ये हाहाकार..! अतिवृष्टी आणि भूस्खलनानं विद्ध्वंस, flood video पाहुन अंगावर येईल काटा
Brazil flood video : एकीकडे कोरोना (Corona)ने हाहाकार उडवला आहे, तर दुसरीकडे अनेक देशांमध्ये निसर्गाचा कहरही पाहायला मिळत आहे. ब्राझीलमधील रिओ दि जानेरियो (Rio de Janeiro) येथे अतिवृष्टी (Heavy rainfall) आणि त्यानंतर भूस्खलन आणि पुरामुळे मोठा विद्ध्वंस झाला आहे.
Brazil flood video : एकीकडे कोरोना (Corona) महामारीने जगभरात हाहाकार उडवला आहे, तर दुसरीकडे अनेक देशांमध्ये निसर्गाचा कहरही पाहायला मिळत आहे. ताजे प्रकरण ब्राझीलमधील रिओ दि जानेरियो (Rio de Janeiro) येथील आहे, जिथे अतिवृष्टी (Heavy rainfall) आणि त्यानंतर भूस्खलन आणि पुरामुळे मोठा विद्ध्वंस झाला आहे. निसर्गाचा हा कहर इतका भीषण आहे, की आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. रिओ दि जानेरियोच्या अग्निशामक विभागाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या बचाव पथक बाधित भागात पीडितांचा शोध घेत आहे. अवघ्या तीन तासांत 30 दिवसांच्या बरोबरीने पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत तिथल्या लोकांची काय अवस्था झाली असेल, याचा अंदाज येवू शकतो.
संपूर्ण परिसर जलमय
या विध्वंसाचे भीषण दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुराने कसा कहर केला, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. रस्त्यावर गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत, शॉपिंग सेंटर्समध्ये पाणी भरले आहे, माल पाण्याने वाहून गेला आहे, घरे तुटली आहेत. अंगावर काटा येईल, असे भयावह दृश्य अनेक भागात पाहायला मिळत आहे. धबधब्यांमध्ये अशी दृश्ये सर्रास पहायला मिळतात, मात्र येथे अशी परिस्थिती शहरात पाहायला मिळत आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर fishvideobrasill नावाने शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 15 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पावसामुळे आलेल्या पुराचे असे भयंकर दृश्य क्वचितच पाहायला मिळते. ब्राझीलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा पाऊस इतक्या लवकर थांबणार नाही, परंतु आणखी काही तास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
View this post on Instagram
आणखी वाचा :