AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुला बॉयफ्रेंड नाही गुलाम पाहिजे’, मोमोज आणि IND-PAK मॅचच्या नादात गर्लफ्रेंडशी ब्रेकअप ! तरूणाचा मेसेज व्हायरल

एका व्यक्तीने त्याच्या मैत्रिणीला पाठवलेला ब्रेकअप मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हॉईसनोटद्वारे पाठवलेला तो मेसेज ऐकून लोकं मात्र हसून-हसून बेजार झाले.

'तुला बॉयफ्रेंड नाही गुलाम पाहिजे', मोमोज आणि IND-PAK मॅचच्या नादात गर्लफ्रेंडशी ब्रेकअप ! तरूणाचा मेसेज व्हायरल
Image Credit source: social media
| Updated on: Oct 28, 2023 | 12:25 PM
Share

Break-up Message Viral on Social Media : नवरा-बायको असतो किंवा बॉयफ्रेंड – गर्लफ्रेंड , भांडणं झाल्यावर अनेकदा बरेच जण एकमेकांपासून वेगळे होतात. नात्यात स्पेस न मिळणं, सतत ॲडजस्ट करावं लागणं किंवा पार्टनर जास्त डिमांडिंग असेल तर बरेच जण ब्रेकअपचा (break up message) मार्ग निवडतात. पण अशा परिस्थितीत एक व्यक्ती डून दुःखी होते तर दुसरी (व्यक्ती) लोकांच्या नजरेत खलनायक बनते. ब्रेकअपबाबत बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडमधील अनेक चॅट्स व्हायरलही (viral message) होतात. असाच एक प्रकार सध्या पुन्हा समोर आला आहे.

सोशल मीडियावर ब्रेकअपचा एक मेसेज सॉलिड व्हायरल झाला आहे. त्याधील व्हॉईसनोट ऐकून अनेक लोकांनी प्रतिक्रिया देत, कमेंट्स केल्या आहेत.

‘आधीपासूनच तू अखडू होतीस’

X या प्लॅटफॉर्मवर ( पूर्वीचे ट्विटर) @tanishaitaan या आयडीद्वारे, एका मुलीने एक व्हॉइसनोट शेअर केली आहे. तिच्या एका मैत्रिणीशी तिच्या बॉयफ्रेंडने ब्रेकअप करताना तो मेसेज पाठवला आहे. मात्र तो मेसेज ऐकून अनेक जण हसायलाच लागले. त्यात तो मुलगा म्हणतो – ‘ ऐक रोशनी, तू आधीच हट्टी होतीस, आणि जेव्हापासून तू तुझे केस लाल रंगाने रंगवलेस तेव्हापासून तू अजूनच अखडू झाली आहेस’

‘ इंडिया पाकिस्तानची मॅचही मिस केली’

तो पुढे म्हणाला – तुझ्या नादात मी भारत-पाकिस्तानची मॅचही मिस केली. सगळ्याच महत्वाचं म्हणजे तुला रोज मोमोज खायचे असतात, पण त्याच्या एका प्लेटमध्ये 633 कॅलरीज असतात. त्या पचवण्यासाठी मला किती मेहनत करावी लागते, तुला कल्पनाही येणार नाही. तू, वाईट वाटू नकोस पण तुला बॉयफ्रेंड नव्हे तर गुलाम हवाय आणि (माझ्याकडून) ही गुलामगिरी होणार नाही, सो आता GoodBye.’ अशा शब्दात त्याने मेसेज टाकत त्या मुलीशी ब्रेकअप केलं.

समोर आला खरा व्हिडीओ

मात्र हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर, अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. त्या मुलाने अॅमेझॉन मिनी टीव्ही शो ‘हाफ लव्ह हाफ अरेंज्ड’ मधील ब्रेकअप स्पीच बरंचसं कॉपी केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यावर @tanishaitaan हिनेही पुढील पोस्टमध्ये त्याचा मूळ व्हिडिओ शेअर केला आणि तिच्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने ब्रेकअपसाठी तेच शब्द कसे कॉपी केलेत, तेही तिने सांगितलं.

ही पोस्ट आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिली असून त्याच्यावर शेकडो कमेंट्स आल्या आहेत. हा मेसेज ऐकून अनेक जण तर हसून बेजार झालेत.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.