Chandra song : अशी लचकत, मुरडत, झुलवत ‘ही’ नववधू आली! स्वत:च्याच लग्नात ‘चंद्रा’ होऊन थिरकली..! Video Viral

अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात चंद्रा ही लावणी असून अमृता खानविलकरने यावर नृत्य केले आहे. आता नववधूंनादेखील या गाण्याने भुरळ घातली आहे. तिने केलेल्या डान्स स्टेप्सना लग्नात उपस्थित असलेल्यांनी आणि विशेषत: तरुणांनी चांगलीच दाद दिली.

Chandra song : अशी लचकत, मुरडत, झुलवत 'ही' नववधू आली! स्वत:च्याच लग्नात 'चंद्रा' होऊन थिरकली..! Video Viral
चंद्रा गाण्यावर थिरकताना नववधूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 12:52 PM

पुणे : चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा (Chandra song Chandramukhi movie) या गाण्याने सध्या राज्यात धुमाकूळ घातला आहे. या गाण्यावर नाचण्याचा मोह अनेकांना आवरत नाही, हे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमधून दिसून येत आहे. असाच मोह एका नववधूलादेखील आवरता आला नाही. नववधूने चंद्रा या गाण्यावर स्वतःच्याच लग्नात भन्नाट डान्स केला आहे. नववधूचा (Bride) हा डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ राज्यातल्या नेमक्या कोणत्या ठिकाणचा आहे, हे समजू शकले नाही. मात्र या नववधूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. चंद्रमुखी सिनेमात हे गाणे अमृता खानविलकरवर (Amruta Khanvilkar) चित्रित झाले आहे. यावर तिने आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केले. आता या गाण्यावर अनेकजणी थिरकताना दिसत आहेत.

स्वत:च्याच लग्नात मनसोक्त नाच

साधारणपणे लग्नात नववधू आणि वर यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी मनसोक्त नाचताना आपण पाहत असतो. त्याचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. काही जण तर इतके बेभान होतात, की त्यांना आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत, याचेही भान राहत नाही. मग हे व्हिडिओ व्हायरल होतात. ते पाहून आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. लग्नात नातेवाईक आणि मित्रमंडळींचे डान्स तर आपण नेहमीच पाहत असतो. आता चक्क नववधूच नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्वत:च्याच लग्नात ही नववधू अशी काही थिरकलीय, की उपस्थितांनीदेखील दिला दाद दिली.

हे सुद्धा वाचा

नववधूंनाही घातली भुरळ

चंद्रमुखी सिनेमा 29 एप्रिलला रिलीज झाला. अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात चंद्रा ही लावणी असून अमृता खानविलकरने यावर नृत्य केले आहे. सिनेमातील या गाण्याने आधीच राज्यात धुमाकूळ घातला आहे. जवळपास 46 मिलियनहून अधिक व्ह्यूज या गाण्याने अल्पावधीतच मिळवले. आता नववधूंनादेखील या गाण्याने भुरळ घातली आहे. तिने केलेल्या डान्स स्टेप्सना लग्नात उपस्थित असलेल्यांनी आणि विशेषत: तरुणांनी चांगलीच दाद दिली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.