Bride Market : हुड्याची अशी पण प्रथा, पतीला मोजावा लागतो पत्नीसाठी पैसा!
Bride Market : जगात अनेक ठिकाणी काही प्रथा असतात. त्या ऐकून आपल्याला धक्का बसतो. जगात असे पण होते का? असे आपण सहज बोलून जातो. या देशात वधूचा बाजार भरतो. कुटुंबिय मुलींचे लग्न, तिच्या आवडीच्या जोडीदाराशी लावून देतात, पण त्यासाठी भावी नवरदेवाला मोठी रक्कम चुकती करावी लागते. कुठे भरतो हा बाजार?
नवी दिल्ली | 29 ऑगस्ट 2023 : जगभरात अशा अनेक प्रथा, परंपरा आहेत की, त्या ऐकून आपल्याला धक्का बसतो. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात काही प्रथा पाळण्यात येतात. त्या आपल्याला विचित्र वाटतात. पण त्या भागात ही प्रथा सामान्य असते. काही प्रथांवर तर विश्वास पण बसत नाही. भारतात आजही अनेक अविश्वसनीय प्रथा, परंपरा पाळण्यात येतात. जगातील या भागात पण अशीच एक प्रथा आहे. भारतात हुंड्याला कायद्याने प्रतिबंध असला तरी समाजात आज पण ही प्रथा सुरुच आहे. तर बुल्गारिया (Bulgaria) या देशात वधूचा बाजार (Bride Market) भरतो. या बाजारात प्रत्येक तरुण महिलेची एखाद्या उत्पादनासारखी विक्री करण्यात येते. गरीब कुटुंब आर्थिक तंगीमुळे मुलींची या बाजारात विक्री करतात. नवरदेवाने एखाद्या मुलीची निवड केल्यानंतर त्याला मुलीच्या कुटुंबियांना रक्कम मोजावी लागते. त्यासाठी कुटुंबिय मुलीच्या ड्रेसवरच प्राईस टॅग लावतो. ही प्रथा विचित्र वाटते, पण तिथल्या नागरिकांसाठी ही प्रथा सामान्य आहे.
मेकअप करुन बाजारात
बुल्गारियाच्या Stara Zagora या ठिकाणी नव वधू दर शनिवारी या वधू बाजारात पोहचतात. Orthodox Christian Lent मध्ये तरुणी नखशीकांत सजून धजून येतात. दागिने घालून सुंदर ड्रेसचा पेहराव करुन, मेकअप करुन या महिला स्वप्नातील राजकुमार शोधतात. कलाईजिस (Kalaidzhis) समूदायात ही प्रथा आहे. हा समूदाय भांडी तयार करण्याचे काम करतो.
KALAIDZHI Culture: Take a look into #Bulgaria‘s Bride market ❤#bride#bridesmaids#Bulgaria #kalaidzhi pic.twitter.com/YlOOsmFagX
— Tiger Mahal 🇨🇦🇮🇳 (@ArvindMahal) July 15, 2022
हा जणू सणच
समूदायातील हजारो लोक या ठिकाणी दर शनिवारी जमतात. ते नाचतात, गातात, भोजनाचा अस्वाद घेतात. या जागेला जिप्सी ब्राईड मार्केट पण म्हणतात. मुलींसोबत त्यांची आई, बहिण व इतर अप्तेष्ट दिसून येतात. 12 व्या – 14 व्या शतकात ही जमात भटकत भटकत बुल्गारिया येथे पोहचली. तेव्हापासून या समूदायात हा वधूंचा बाजार भरतो. या समूदायात डेटिंग हा प्रकार नसतो. मुलगी वयात आली की, तिच्यासाठी मुलगा याच बाजारात शोधल्या जातो. मुलाकडील मंडळी पण पैसे सोबत आणतात आणि याठिकाणी लग्नाची बोलणी करतात.
समाजाबाहेर नाही करत लग्न
हा समाज रुढीवादी आहे. या समाजात समुदायाबाहेर लग्न करणे कमी पणाचे मानण्यात येते. मुलींसाठी समाजात अनेक प्रथा आहेत, तशा मुलांसाठी पण आहेत. मुलीच्या कौमार्यावर जास्त भर असतो. त्यामुळे समुदायात डेटिंग अथवा प्रेम प्रकरणाचे प्रमाण कमी आहे. मुलगी वयात येताच तिचे समाजातील तरुणासोबत लग्न लावण्यात येते.
लाखो रुपयांची किंमत
या समुदायात मुलाकडेच मुलीसाठी हुंडा देतात. मुलीची एक प्रकारे खरेदी करतात. लग्नासाठीचे वय 16-20 या दरम्यान योग्य मानण्यात येते. येथील मुलींचे शिक्षण ही फार नसते. वधूसाठी लाख रुपयांच्या वर पण किंमत मोजली जाते. लग्नावर कमी खर्च करण्यात येतो. प्रथा आणि परंपरेनुसार हे लग्न लावण्यात येते.