ऐनवेळी नवरी म्हणाली, “मी जाणार नाही”
लग्नसमारंभात तुम्ही अनेकांना नाचताना पाहिलं असेल आणि अनेक वधू-वरांना नाचताना पाहिलं असेल, पण हल्ली वधूचा एक अतिशय मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून लोकांनी डोक्यालाच हात मारलाय.

लग्नाचा हंगाम येताच सोशल मीडियावर त्यासंबंधीचे विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागतात. काही व्हिडिओ लोकांना हसवतात तर काही व्हिडिओ लोकांना भावनिक देखील करतात. त्याचबरोबर काही व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना संतापही येतो. लग्नसमारंभात तुम्ही अनेकांना नाचताना पाहिलं असेल आणि अनेक वधू-वरांना नाचताना पाहिलं असेल, पण हल्ली वधूचा एक अतिशय मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून लोकांनी डोक्यालाच हात मारलाय.
खरं तर वधू योग्य वेळी स्टेजवर पोहोचू शकली नाही त्यामुळे ती संतापली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बॅकग्राऊंडमध्ये गाणे वाजत आहे, जे ऐकून वधू चिंताग्रस्त झाली आणि मी जाणार नाही असे म्हणू लागली. मग ती म्हणते की पहिल्यापासून गाणं लावू नका १ मिनिट 18 सेकंदाने लावा. खरं तर तिची स्टेजची एंट्री फिक्स होती. जेव्हा एंट्री मारायची वेळ आली तेव्हा त्या वेळी गाणंच वाजलं नाही आणि मग तिला राग आला.
आजकाल लग्नसमारंभात वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. कधी वधू-वर नाचताना दिसतात, तर कधी स्टेजवर वधू-वरांची भव्य एन्ट्री होते, हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तसं पाहिलं तर काही वेळा जोडप्याच्या एन्ट्रीची वेळही बिघडते, जी त्यांच्यासाठी चिंतेची बाब असते. असंच काहीसं या व्हिडिओत दिसत आहे.
View this post on Instagram
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर wedus.in नावाच्या आयडीसह हा मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 1 लाख 62 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 5 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे आणि लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी ‘रील का चक्कर है बाबू जी’ म्हणतंय, तर कुणी ‘लग्नानंतर बिचाऱ्या मुलाचं काय होणार’ असं म्हणतंय.