म्हशीनं ‘या’ जनावरांना शिकवला चांगलाच धडा! कर्माचं फळ मिळालं थेट 5Gच्या स्पीडनं..! Video viral
Buffalo funny video : एक व्हायरल (Viral) व्हिडिओ आहे, ज्यामध्ये काही लोकांनी बैलगाडीला (Bullock cart) म्हैस (Buffalo) बांधली आहे. ते त्या गाडीवर स्वार होऊन म्हशीला जोरात पळवण्यास भाग पाडत आहेत. तेव्हा असे काही घडते, की लोक म्हणतात, की हेच ‘कर्म’ आहे.
Buffalo funny video : प्रत्येकाला त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच मिळते, असे तुम्ही नेहमी ऐकत असाल. पण त्यांना ते लगेच भेटताना तुम्ही पाहिले नसेल. प्रत्येकाला सल्ला दिला जातो, की चांगल्या कर्मांचेदेखील चांगले फळ मिळते. कधीकधी कर्माचे फळ जरा जास्तच लवकर मिळते. अगदी अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे काही व्हायरल (Viral) व्हिडिओ दिसू लागले आहेत, ज्यामध्ये काही लोकांनी बैलगाडीला (Bullock cart) म्हैस (Buffalo) बांधली आहे. ते त्या गाडीवर स्वार होऊन म्हशीला जोरात पळवण्यास भाग पाडत आहेत. तेव्हा असे काही घडते, की लोक म्हणतात, की हेच ‘कर्म’ आहे. जे पेरणार तेच उगवेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की दोन बैलगाड्या एका मोटरसायकलसह रस्त्यावर धावताना दिसत आहेत. यावेळी जे होते ते पाहून तुम्हाला हसू येईल.
अचानक म्हशीने घेतला वेग
बैलगाडी चालवणाऱ्या लोकांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे. यामध्ये काही लोक बैलगाडीवर स्वार आहेत, ते बैलगाडीला बांधलेल्या म्हशीला जोरात पळण्यास भाग पाडत आहेत, अचानक म्हशीने वेग घेतला. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेल की रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकातून म्हैस आपला मार्ग बदलते आणि त्यामुळे गाडीचा तोल बिघडतो आणि गाडीतील सर्व लोक खाली पडतात. त्याचवेळी म्हैस त्या सर्वांपासून दूर पळते.
Karma ? (Watch till the end) pic.twitter.com/4ixpQ7Z5xO
— Susanta Nanda IFS (@susantananda3) March 28, 2022
ट्विटरवर शेअर
21 सेकंदाचा हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले, ‘कर्म.’ बातमी लिहिपर्यंत या व्हिडिओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच हा व्हिडिओ पाहून लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
‘पलीकडून कोणतेही अवजड वाहन येत नव्हते, नाहीतर…’
एका यूझरने लिहिले, की सुदैवाने पलीकडून कोणतेही अवजड वाहन येत नव्हते, अन्यथा मोठी घटना घडू शकली असती.’ दुसऱ्या यूझरने लिहिले, की शेवटी, मनुष्य प्राण्यांवर इतका क्रूर कसा असू शकतो. दुसऱ्या यूझरने लिहिले, की म्हशीने अशा लोकांना योग्य न्याय दिला आहे. याशिवाय अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या.