Video Viral : ‘अति घाई संकटात नेई’, ओव्हरटेक करण्याचा बेशिस्त कारचालकाचा प्रयत्न फसला आणि…
वाहतुकीचे नियम (Traffic Rule) पाळणं अत्यंत आवश्यक आहे. असे व्हायरल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये वाहतूक नियमांचं पालन न केल्यामुळे लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
Accident Video : रस्त्यानं चालत असाल तर चारही बाजूंनी काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही चालत असाल किंवा कारनं जात असाल तर तुम्ही खूप सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे, कारण थोडासा निष्काळजीपणाही तुमचा जीव घेऊ शकतो. रस्त्यावरून चालताना वाहतुकीचे नियम (Traffic Rule) पाळणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र, काही लोकांमध्ये कमालीची बेशिस्ती असल्यानं ते इकडून तिकडे वाहनं बाहेर काढतात किंवा जागा नसतानाही मध्येच वाहनं घुसवतात, असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अशा परिस्थितीत कधी-कधी त्यांना मोठं नुकसानही सहन करावं लागतं. सोशल मीडियावर असे सर्व व्हायरल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये वाहतूक नियमांचं पालन न केल्यामुळे लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
गाडीचं नुकसान
या व्हिडिओमध्ये एका कार चालकाला ओव्हरटेक करण्याची खूपच हौस आलीय. अशा स्थितीत तो स्वत:चंच नुकसान करत नाही तर त्याच्या शेजारी चालणाऱ्या ट्रकचंही नुकसान करतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की सर्व वाहनं आपल्या मार्गावरून सरळ जात आहेत, तर कार चालक ओव्हरटेक करण्याची स्पर्धा करत आहे, पण तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना, त्याची कार मागून येणाऱ्या ट्रकला धडकते. अशा स्थितीत त्याच्या गाडीचं नुकसान होतंच, शिवाय ट्रकच्या वरून भरलेला मालही तिथल्या रस्त्यावर खाली पडतो. त्यामुळे तिथं वाहतूक कोंडी झाली असावी, हे उघड आहे.
ट्विटर हँडलवर शेअर
आता हा व्हिडिओ कुठला आहे, हे माहीत नाही, पण आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की रस्त्यावर एक छोटीशी चूक अपघातांची धोकादायक मालिका सुरू करू शकते. म्हणून नेहमी सुरक्षा राहा आणि नियमांचं पालन करा आणि ते पूर्ण करा.
सड़क पर एक मामूली गलती, खतरनाक सीरीज़ ऑफ एक्सीडेंट्स ट्रिगर कर सकती है. इसलिए हमेशा सुरक्षा नियमों का पालन करें और करवाएं. #RoadSafety #RoadSafetyAwareness pic.twitter.com/pjHJH0Nxbo
— Dipanshu Kabra (@ipskabra) January 30, 2022
लाइक्स आणि कमेंट्स
अवघ्या 5 सेकंदांचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत 6 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाइक केलं आहे तसंच लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.