पावसाळा येताच सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागतं. नद्या दुथडी भरून वाहत आहेत, रस्ते जलमय झाले आहेत आणि अनेक ठिकाणी गावांचा संपर्कही तुटला आहे. लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्या आधी बराच विचार करावा लागतो. ज्या रस्त्यांवर उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात वाहनं धावत होती, त्या ठिकाणी पावसात अक्षरश: बोटी दिसत आहेत. अनेक ठिकाणी भीषण पुरामुळे (Flood) पूलही (Bridge) पूर्णपणे कोसळल्याचं तुम्ही पाहिलं असेल. अशा परिस्थितीत अनेक जण एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनारी जाण्यासाठी जीव मुठीत धरून प्रवास करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.
पुराच्या पाण्यात दोन एक तुटलेला पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात, त्यापैकी एक तो ओलांडण्यात यशस्वी होतो, परंतु त्याच्या पाठीमागे असलेली कार पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ओलांडू शकत नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन गाड्या नदीच्या जोरदार प्रवाहामधून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यातील एक गाडी अचानक पुलावरून खाली येते आणि नदीच्या प्रवाहाबरोबर वाहूत जाते. त्यामुळेच धोकादायक ठिकाणी धोका पत्करू नये. धाडसाच्या नावाखाली अनेकदा स्टंट केले जातात, मात्र हा स्टंट जीवावर बेतू शकतो.
या धोकादायक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 7ama._.hd या आयडी नावाने शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाईकदेखील केले आहेत. हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं की, ‘जर त्याने धीर धरला असता तर तो वाचला असता. तो त्याच्या मागे का गेला?’ तर दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘त्या रस्त्यावरून जाताना ते नेमका कसला विचार करत होते?’