अरे, आपल्याला खेळायचंय; शिकार नाही करायची! असं तर ‘ही’ मांजर म्हणत नसेल ना! Funny video viral

Dog and cat video : कुत्रा आणि मांजर हे एकमेकांचे ओळखीचे शत्रू मानले जात असले तरी त्यांची मैत्रीही दिसून येते. असाच एक मजेशीर (Funny) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होतोय, ज्यात कुत्रा, मांजर एकत्र खेळताना (Playing) दिसत आहेत.

अरे, आपल्याला खेळायचंय; शिकार नाही करायची! असं तर 'ही' मांजर म्हणत नसेल ना! Funny video viral
कुत्रा आणि मांजरीचा रंगलाय अनोखा खेळ
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 2:19 PM

Dog and cat funny video : जगात अनेक प्राणी आहेत, परंतु त्यापैकी फक्त काही आहेत, ज्यांना लोक त्यांचे पाळीव प्राणी मानतात. त्यात कुत्रे आणि मांजर पहिल्या क्रमांकावर आहेत. जगात जर कोणता प्राणी सर्वात जास्त पाळला गेला असेल तर तो कुत्रा आणि मांजर आहे. त्यांना वाढवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ते माणसांमध्ये इतके मिसळतात, की ते प्राणी आहेत हेच कळत नाही. काही लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानतात आणि त्यांना मानवाला मिळणारी प्रत्येक सुखसोयी देतात. लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांशी खूप खेळतात आणि प्राणीदेखील त्यांचे पालन करतात. कुत्रा आणि मांजर हे एकमेकांचे ओळखीचे शत्रू मानले जात असले तरी काही वेळा त्यांची मैत्रीही दिसून येते. असाच एक मजेशीर (Funny) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये कुत्रा आणि मांजर एकत्र खेळताना (Playing) दिसत आहेत.

कुत्र्याने हसवले

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की घराच्या कॉरिडॉरमध्ये क्रीम आणि मेकअप किटच्या काही ट्यूब्स सजल्या आहेत आणि एक मांजर त्या न पाडता त्यामधून जाण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे डायनामाइट टाकल्याप्रमाणे ती पळून जात आहे. मांजर काही न पाडता तेथून सहज निघून जाते, पण कुत्र्याने जे केले ते पाहून तुम्ही हसून जाल. कुत्रा थोडा मागे पळत गेला आणि तिथे ठेवलेले सर्व सामान खाली टाकले आणि स्वतःही पडला. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला मांजर आणि कुत्र्याच्या मेंदूमधील फरकाची कल्पना येईल. जिथे मांजराने मेंदूचा वापर केला, तिथे कुत्र्याने मेंदू न वापरता काम केले आणि काम बिघडवले.

ट्विटरवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ @buitengebieden_ या नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 19 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 7 लाख 50 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 42 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने या मांजरीबद्दल लिहिले आहे, ‘याला धूर्त म्हणतात’, तर दुसऱ्या यूझरने या अनोख्या गेमची विजेती म्हणून मांजरावर कमेंट केली आहे.

आणखी वाचा :

Leopard attack dog : आत्मविश्वास असावा तर असा..! कुत्र्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याचीच झाली पळापळ, Video viral

Elephant viral video : ‘या’ हत्तीला आहे भलतीच ‘खाज’, झाडावर असा काही केला ‘प्रहार’ की…

भावा, कशाला वेडेपणा करतोयस? तरसाचं चुंबन घेणाऱ्याला यूझर्स करतायत सावधान! Hyena video viral

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.