कोण कोणाला कॉपी करतंय? मांजरीचा हा Cute workout video पाहा आणि तुम्हीच ठरवा!
तुम्ही सोशल मीडियावर व्यायामाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. पण कधी मांजरी(Cat)ला व्यायाम (Workout) करताना पाहिले आहे का? आजकाल असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Cat cute Video : व्यायामामुळे शरीर मजबूत आणि निरोगी राहते, हे तुम्हाला माहीत आहेच म्हणूनच लोक सकाळी लवकर उठतात आणि वर्कआउट करण्याकडे जास्त लक्ष देतात. भलेही अनेकांना सकाळी लवकर उठण्याचा आळस असतो, पण एवढे जाणून घ्या की जर तुम्ही सकाळी उठून वर्कआउट केले तर संपूर्ण दिवस चांगला जातो. दिवसभर शरीरात ऊर्जा राहते आणि ताजेपणा जाणवतो. याशिवाय याचे अनेक फायदेही आहेत. सकाळच्या व्यायामामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो आणि लठ्ठपणा कमी होण्यासही मदत होते. तुम्ही सोशल मीडियावर व्यायामाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण तुम्ही कधी मांजरी(Cat)ला व्यायाम (Workout) करताना पाहिले आहे का? आजकाल असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
स्ट्रेचिंग एक्सरसाइज
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक महिला स्ट्रेचिंग एक्सरसाइज करत आहे आणि त्यासोबत मांजरही वर्कआउट करताना दिसत आहे. त्याची अप्रतिम व्यायाम पाहून तुमचा विश्वास बसणार नाही, की फक्त एक मांजर असा वर्कआऊट करत आहे. नंतर ती एका पायावर उभी राहून व्यायाम करताना दिसते. असा व्यायाम करताना तुम्ही कोणत्याही प्राण्याला पाहिलं नसेल आणि त्यात एक छोटी मांजरही असेल. हा अतिशय गोड व्हिडिओ आहे. व्हिडिओ पाहून असं वाटतंय, की मांजर त्या महिलेला वर्कआउट करायला शिकवत आहे. अशा स्थितीत लोकांमध्ये संभ्रम आहे की कोण कोणाला शिकवत आहे?
ट्विटर हँडलवर शेअर
आयएएस अधिकारी डॉ. एम. व्ही. राव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘मॉर्निंग वर्कआउट… पण कोण कॉपी करत आहे’. अवघ्या 6 सेकंदांच्या या व्हिडिओला लोक पसंत करत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी या व्हिडिओचे वर्णन प्रेक्षणीय तर काहींनी याला ग्राफिक्स म्हटले आहे, पण काहीही असले तरी हा व्हिडिओ खरोखरच छान आहे, जो पाहून तुम्ही नक्कीच या मांजरीचे चाहते व्हाल.
Morning Workout But who is imitating whom ? pic.twitter.com/8WqBOEGqLk
— Dr. M V Rao, IAS (@mvraoforindia) February 2, 2022