कुलूप तोडून घरात घुसला, पलंगावर झोपला, जाताना असं काही… अनोळखी व्यक्तीच्या कारनाम्याने तिला धक्का
एक महिला तिच्या मैत्रिणीच्या घरी असताना दुसरा इसम थेट तिच्या घरात घुसला. तिच्या बेडवर झोपला. थोड्या दिवसांनी त्याने तिला थेट सोशल मीडियावर मेसेज पाठवायला सुरूवात केली.
एडिनबर्ग | 13 सप्टेंबर 2023 : तुम्ही घरात नसताना एखादी व्यक्ती तुमच्या घरात घुसली आणि राहून गेली, हे समजले तर कसे वाटेल, धक्का बसेल ना ? साहजिकच आहे. पण अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. एक महिला बाहेर गेली असताना, एक इसम थेट तिच्या (man broke in womans house) घरात घुसला. तिच्या पलांगवरही झोपला आणि एक वस्तूही सोडून गेला. त्या महिलेने घरी आल्यावर हे पाहिलं आणि सिक्युरिटी कॅमेरा चेक केला असता, जे दिसलं ते पाहून तिला धक्काच बसला. हे प्रकरण स्कॉटलंड येथील आहे. तो इसम घरात फार घाण पसरवून गेला होता. जमिनीवर आणि बेडवर तर रक्ताचे डागही दिसत होते. पण हे इथंच थांबल नाही. त्यानंतर त्या इसमाने महिलेला सोशल मीडियावर शोधून तिथे मेसेजही पाठवले. हे पाहून ती हादरलीच.
न्यूयॉर्क पोस्टटनुसार, 22 वर्षीय सुलिवान कॅटलिन ही तिच्या मित्राच्या घरी एक रात्र थांबली होती. ती सकाळी उठली असता फोनवर तिला सिक्युरिटी कॅमेरा सॉफ्टवेअरवरून सूचना येऊ लागल्या. आणि तिच्या घरात कोणीतरी घुसल्याचे उघड झाले. माझा विश्वासच बसत नव्हता. मी हैराण झाले होते. पण हे नक्की काय होतंय हेच मला कळेना. एक पुरूष माझ्याच बेडवर झोपला होता, याची मी कल्पनाच करू शकत नव्हते. तो माझ्या घरात नेमका घुसला कसा, हेच मला समजत नव्हते, असे सुलिवानने सांगितले. मात्र घरात कोणी घुसल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांना कळवले आणि ती घराच्या दिशेने निघाली.
घुसखोराला अजूनही अटक नाही
मात्र, या घुसखोराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या घटनेनंतर काही दिवसांनी त्याच इसमाने सुलिवान हिच्याशी फेसबूरवर संपर्क साधला आणि तिला मेसेज पाठवू लागला. ‘मी तुमची मनापासून माफी मागतो. माझी तब्येत बरी नव्हती. मला तुमच्या घरी विश्रांती घेऊ दिल्याबद्दल धन्यवाद. कोणतेही नुकसान झाले नसेल अशी आशा आहे. आपण एक दिवस भेटू शकू, अशीही मी आशा करतो, असे त्याने मेसेजमध्ये नमूद केले. मात्र या मेसेजमुळे सुलिवानची चिंता वाढली असून तिच्या मुलाबद्दलही तिला काळजी वाटत आहे. तिने तातडीने परत पोलिसांशी संपर्क साधला असतात त्यांनी त्या इसमाला सोशल मीडियावर ब्लॉक करण्याचा सल्ला दिला. पण एकदा घरात घुसलेला तो इसम पुन्हा आपल्या घरी येऊ शकतो, अशी भीती सुलिवान हिला वाटत आहे. या इसमाला अद्याप अटक न झाल्यामुळे तिला सुरक्षिततेची काळजी वाटत आहे.