Viral : चुकून काच फुटली असती तर? बाळाचा हा अंगावर काटा आणणारा Panther Video पाहा

Cheetah tries to prey baby : हा व्हिडिओ ब्रिटनमधील (UK) वूस्टरशायरचा (Worcestershire) आहे. बेवडले येथील वेस्ट मिडलँड सफारी पार्कमधील 'चीता सफारी लॉज'मध्ये रेकॉर्ड केलेली क्लिप (Clip) आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

Viral : चुकून काच फुटली असती तर? बाळाचा हा अंगावर काटा आणणारा Panther Video पाहा
बाळावर झडप घालण्याचा चित्त्याचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 11:42 AM

Cheetah tries to prey baby : सोशल मीडियावर दररोज कोणता ना कोणता व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतो. अनेक वेळा हे व्हिडिओ पाहण्यात मजा येते, तर काही व्हिडिओ असे समोर येतात. जे पाहून लोकांचा विश्वास बसत नाही, की असे प्रत्यक्षात घडू शकते? अलीकडच्या काळातही असाच एक व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हे पाहून तुम्ही सुद्धा क्षणभर घाबरून जाल कारण व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका चित्त्याने मुलावर झडप घालण्याचा प्रयत्न केला होता. हे पाहून अनेकजण क्षणभर घाबरले. हा प्रकार ब्रिटनमधील (UK) वूस्टरशायरचा (Worcestershire) आहे. बेवडले येथील वेस्ट मिडलँड सफारी पार्कमधील ‘चित्ता सफारी लॉज’मध्ये रेकॉर्ड केलेली क्लिप (Clip) आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

मुलावर झडप घालण्याचा प्रयत्न

‘डेली मेल’ या इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, ओटोचे वडील बेन मिलर (Ben Miller) यांनी अंगावर काटा आणणारा क्षण कॅमेऱ्यात कैद केला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की सफारी लॉजमधील एका खोलीत एक मूल जमिनीवर रांगत आहे, परंतु काही सेकंदांनंतर कुणीतरी तिथे येते आणि मुलावर झडप घालण्याचा प्रयत्न करते. पण मुलाच्या आणि त्याच्यामध्ये काचेची पारदर्शक भिंत आहे हे त्याच्या लक्षात येत नाही, ज्यामुळे चित्त्याने झडप टाकल्यानंतरही तो मुलापर्यंत पोहोचत नाही.

‘धक्कादायक व्हिडिओ’

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले, की चुकून काच फुटली असती तर मुलाचा जीव वाचणे अवघड होते.’ तर दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला धक्का बसला आहे.’ तिसऱ्या यूझरने लिहिले, ‘चित्त्याचा हल्ला निरुपयोगी ठरला.’ दुसर्‍या यूझरने लिहिले, की अशा घटना अचानक घडतात तेव्हा सगळे घाबरतात. याशिवाय आणखी अनेक यूझर्सनी यावर कमेंट्सद्वारे आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

आणखी वाचा :

Online Classesचा ‘असा’ही परिणाम, चिमुरड्याचा ‘हा’ Viral Video पाहा, हसू आवरणार नाही

कोल्हाही घेतोय बँजोच्या सुरांचा आनंद, 1 कोटींहून जास्तवेळा पाहिला गेलाय ‘हा’ Viral Video

Viral : …अन् अचानक हवेत उडू लागते कार, Cyrus Dobre यानं शेअर केलेला हा flying car video पाहा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.