Video | गजबजलेल्या रेल्वेस्थानकावर महिला पोलिसांचा धम्माल डान्स, व्हिडीओ व्हायरल
चेन्नईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क रेल्वेच्या महिला पोलीस डान्स करताना दिसतायत. (chennai railway police dance video)
चेन्नई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तसेच उपचार वेळेवर न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झालाय. तसे काही व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर आलेले आहेत. मात्र, आजकाल सोशल मीडियावर मजेदार, प्रेरणा देणारे तसेच जनजागृती करणारे व्हिडीओसुद्धा अपलोड केले जात आहेत. सध्या असाच चेन्नईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क रेल्वेच्या महिला पोलीस डान्स करताना दिसतायत. (Chennai railway police dance for Covid prevention video goes viral on social media)
व्हिडीओमध्ये काय आहे ?
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा चेन्नई येथील आहे. या व्हिडीओमध्ये चेन्नई रेल्वेस्थानकावर महिला रेल्वे पोलीस डान्स करताना दिसतायत. सध्या व्हायरल होत असलेल्या ‘एन्जॉय एन्जामी’ (Enjoy Enjaami) या गाण्यावर त्या डान्स करतायत. यापूर्वी याच गाण्यावर केरळमधील पोलिसांनीसुद्धा डान्स केला होता. मात्र, यावेळी चेन्नईच्या गजबजलेल्या रेल्वेस्थानकावर महिला रेल्वे पोलीस अचानकपणे डान्स करताना पाहिल्यावर अनेकांना विश्वसाच बसत नव्हता. नेहमीच कडक भूमिका घेणारे पोलीस थेट डान्स करताना पाहून अनेकजण अवाक् झाले होते.
कोरोनाविषयक जागृतीसाठी डान्स
व्हिडीओमध्ये रेल्वे पोलीसमधील सहा महिला डान्स करताना दिसत आहेत. यातील चार पोलीस युनिफॉर्ममध्ये आहेत. व्हिडीओमध्ये सर्व महिला पोलिसांच्या हातामध्ये हँडग्लोज आहेत. तसेच सर्वांच्या चेहऱ्यावर मास्क लावलेले आहे. या सर्व महिला पोलिसांनी यावेळी डान्स करत प्रवाशांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग समजाऊन सांगितला.
पाहा व्हिडीओ :
Watch the enthralling performance by Chennai Railway Police at Chennai Central Railway station as a #COVID19 awareness program..
Giving tough competition to @TheKeralaPolice..?? pic.twitter.com/AJCXyWWs6J
— Pramod Madhav♠️ (@PramodMadhav6) May 9, 2021
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या या व्हिडीओला आवडीने पाहिले जात असून मजेदार कमेंट्स केल्या जात आहेत. पोलिसांच्या या कार्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदनही केले आहे.
इतर बातम्या :
‘आम्हाला नवा भारत नको’, सोशल मीडियावर #NoMoreModi ट्रेंडिंगवर, वाढत्या कोरोनामुळे लोक भडकले
(Chennai railway police dance for Covid prevention video goes viral on social media)