Viral : ‘रासोडे में कौन था’नंतर आता ‘खाली छोरी पटाता है’नं घातलाय धुमाकूळ, 82 लाखांहून जास्त व्ह्यूज; पाहा ‘हा’ Video
Chhori Patata Hai : एका डायलॉगचे रिमिक्स व्हर्जन 'खाली छोरी पटाता है'ने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. जे संगीतकार आणि YouTuber मयूर जुमानी यांनी तयार केले आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ 82 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
Chhori Patata Hai : गायक यशराज मुखाते यांनी रिमिक्स केलेले ‘रासोडे में कौन था’ (Rasode Main Kon Tha) आणि ‘पावरी हो रही है’ (Pawri ho rahi hai) हे गाणे तुम्हाला आठवत असेलच. हे गाणे सोशल मीडियाच्या (Social media) जगात हा ट्रेंड झाले होते. आता अशाच एका डायलॉगचे रिमिक्स व्हर्जन ‘खाली छोरी पटाता है’ने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. जे संगीतकार आणि YouTuber मयूर जुमानी यांनी तयार केले आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ 82 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हायरल व्हिडिओ पुन्हा-पुन्हा पाहण्यास लोक पसंती देत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पत्रकाराच्या प्रश्नांवर एक व्यक्ती विद्यार्थ्यांची तक्रार करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे, जे वारंवार विद्यार्थ्यांबद्दल सांगतात, की खाली छोरी पटाता है.
तयार केले मॅशअप
ही व्यक्ती पुन्हा पुन्हा म्हणते, मला सांगा त्यांचे शिक्षणात लक्ष आहे काय? या व्हिडिओमध्ये, ‘खाली छोरी पटाता है’ हे वाक्य घेऊन एक मॅशअप तयार करण्यात आले आहे. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. हा व्हिडिओ इंटरनेटवर लोकांना खूप आवडला आहे आणि लोक याचा खूप आनंद घेत आहेत.
पुन्हा पुन्हा पाहतायत यूझर्स
यूट्यूबर मयूर जुमानीचा हा व्हिडिओ लोकांना किती आवडला आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो, की आतापर्यंत सुमारे 5 लाख लोकांनी याला लाइक केले आहे, तर व्हिडिओला 8.2 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय लोकांकडून कमेंट्स केल्या जात आहेत. एका यूझरने कमेंट करताना लिहिले आहे, की हा मास्टरपीस बनवला आहे. त्याचवेळी आणखी एका यूझरचे म्हणणे आहे, की हा व्हिडिओ खूपच विनोदी आहे. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरने कमेंट करताना लिहिले आहे, की मला ते पुन्हा पुन्हा बघायला आवडते. एकूणच, ‘छोरी पटाता है’च्या रिमिक्स व्हर्जनने लोकांना भुरळ पाडली आहे.