Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kid shocking video : जिराफाला खाऊ घालायला जातो चिमुरडा आणि होतं असं काही, की आई-वडिलांना फुटतो घाम!

Animal Shocking video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल. व्हिडिओमध्ये, एक मूल (Kid) प्राणीसंग्रहालयात (Zoo) जिराफला (Giraffe) खायला घालण्याचा प्रयत्न करत आहे, त्या दरम्यान त्याचे काय होईल, याची त्याने कल्पनाही केली नसेल.

Kid shocking video : जिराफाला खाऊ घालायला जातो चिमुरडा आणि होतं असं काही, की आई-वडिलांना फुटतो घाम!
डहाळीसकट चिमुरड्याला जिराफानं उचललंImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 1:14 PM

Animal Shocking video : भुकेल्यांना अन्न देणे हे पुण्य मानले जाते, पण पुण्य करणे लहान मुलांसाठी कधीकधी आंगलट येते. असेच पुण्यकर्म करताना मुलाचे काय झाले हे पाहून पालकांची तारांबळ झाली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिराफ या प्राण्याशी संबंधित हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल. व्हिडिओमध्ये, एक मूल (Kid) प्राणीसंग्रहालयात (Zoo) जिराफला (Giraffe) खायला घालण्याचा प्रयत्न करत आहे, त्या दरम्यान त्याचे काय होईल, याची त्याने कल्पनाही केली नसेल. प्राणिसंग्रहालयात जाऊन प्राण्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि पुण्य मिळवण्यासाठी त्यांना काहीतरी खायला देण्याचा विचार करणाऱ्या अशा लोकांसाठीही हा व्हिडिओ धडा आहे. असे लोक हे देखील विसरतात की प्राण्यांच्या खूप जवळ जाणे धोकादायक असू शकते.

ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ शेअर

व्हिडिओमध्ये असाच एक प्रसंग आहे, ज्यामध्ये एक मूल जिराफाला काहीतरी खायला घालण्याचा विचार करत आहे. यादरम्यान त्याचे आई-वडीलही त्याच्या पाठीशी उभे असतात. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की मुलगा त्याच्या आई-वडिलांसोबत उभा आहे. त्याच वेळी, जाळ्याच्या आत एक जिराफ दिसतो. दरम्यान, मूल जिराफाला खायला एक डहाळी देते. जिराफ तोंडाने डहाळी पकडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यासह, तो मुलालादेखील वर उचलतो. @Laughs_4_All नावाच्या ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

…तर मोठी दुर्घटना घडू शकली असती

हे भितीदायक दृश्य पाहून सुरुवातीला पालकांना काहीच समजत नाही. मात्र, लगेचच त्यांनी मुलाचा पाय पकडला. व्हिडिओमध्ये पुढे पाहता येईल, की पालक आपल्या मुलाचा पाय पकडून खाली ओढतात आणि त्या जिराफापासून आपल्या मुलाचा जीव वाचवतात. पालकांनी वेळीच मुलाचे पाय पकडले नसते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. या धक्कादायक व्हिडिओला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

आणखी वाचा :

‘असे’ आनंदाचे क्षण नवी आशा देतील? रशिया-युक्रेन युद्धादरम्यान ‘हा’ भावुक video होतोय Viral

काका ऐकत नाहीत आता..! Michael Jacksonलाही दिलीय टक्कर, Viral dance video पाहून हसून हसून लोटपोट व्हाल

‘आम्ही तिकीट काढत नसतो’ म्हणणाऱ्या खोडकर प्रवाशांना Conductorनं दाखवला इंगा! Funny video viral

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.