कोरोना महामारीत हा मुलगा नेटकऱ्यांचं मन जिंकतोय, या चिमुकल्याची सोशल मीडियावर चर्चा, फोटो एकदा पाहाच

सोशल मीडियावर एका लहान मुलाचा फोटो व्हायरल होतं आहे. Child writing khush rahiye

कोरोना महामारीत हा मुलगा नेटकऱ्यांचं मन जिंकतोय, या चिमुकल्याची सोशल मीडियावर चर्चा, फोटो एकदा पाहाच
Viral Photo of child
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 12:49 PM

नवी दिल्ली: भारत कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोना संसर्गाची वाढती रुग्णसंख्या, बेड मिळण्यासाठी लोकांची होणारी धडपड, रुग्णांचे होणारे मृत्यू हे सगळं चिंता वाढवणारं ठरलं आहे. मात्र, या संकटाच्या काळात प्रत्येक जण त्याला जमेल तसं काहीना काही मदत करत आहे. संकटाच्या काळात एक आनंद देणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या फोटोला पाहून तुम्हालाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. (Child writing khush rahiye on food packets for covid patients photo goes viral social users appreciate child)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये नेमकं काय?

सोशल मीडियावर एका लहान मुलाचा फोटो व्हायरल होतं आहे. लहान मुलगा जेवणासाठी तयार करण्यात आलेल्या पार्सलवर खुश रहिये असं लिहित आहे. संबंधित मुलांची आई रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी जेवण बनवण्याचं काम करते. जेवणाच्या पॅक केलेल्या पॅकेटसवर रुग्ण बरे व्हावे म्हणून लहान मुलगा निरागस भावनेनं खुश रहिये असं लिहितोय. लहान मुलाची ही कृती नेटकऱ्यांना चांगलीच आवडलेली आहे. नेटकरी त्या मुलाचं अभिनंदन करत आहेत. सोशल मीडियावर त्या मुलाचा फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळाला. या मुलाच्या फोटोची दखल बऱ्याच माध्यमांनी घेतली आहे.

सोशल मीडियावर हा फोटो वेगानं व्हायरल होत आहे. लोक हा फोटो पाहून त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. फोटो पाहून एका नेटकऱ्यानं चारी बाजूला निराशा दिसत असताना असा एखादा फोटो पाहिल्यानंतर सकारात्मक उर्जा संचारते असं म्हटलं आहे. तर, दुसऱ्या नेटकऱ्यानं कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये लहान मुलाचा निरागसपणा पाहून आपण देखील आनंद वाटला पाहिजे असं म्हटलं आहे.

कोरोना रुग्णसंख्या तीन लाखांच्या खाली

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार (Corona Cases in India) पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशात 24 तासाच्या कालावधीत तीन लाखांपेक्षा कमी नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तरी आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत चार हजारांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात 2 लाख 67 हजार 334 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र कोरोनाबळींचा आकडा काहीसा धडकी भरवणारा आहे. कारण एका दिवसात तब्बल 4 हजार 529 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. हा एका दिवसातील कोरोनाबळींचा विक्रम आहे.

संबंधित बातम्या:

आरोप करणारी तोंडं आता बंद, पोलिसांवर कोणताही डाग लागू देणार नाही : उद्धव ठाकरे

Shardul Thakur | तुला परत मानलं रे ठाकूर, शार्दूलच्या बॅटिंगवर विराट कोहली फिदा, मराठीत कौतुक

Child writing khush rahiye on food packets for covid patients photo goes viral social users appreciate child

मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.