AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओके आता कळलं ह्यांना आपलं पूर्वज का म्हटलं जातं! चिंपांझीचा हा व्हिडीओ बघा, तुम्हालाही कळेल

काही व्हिडीओ लोकांना हसवतात तर काही लोकांना सरप्राईजही देतात. लोकांना सहसा मजेदार व्हिडिओ आवडतात.

ओके आता कळलं ह्यांना आपलं पूर्वज का म्हटलं जातं! चिंपांझीचा हा व्हिडीओ बघा, तुम्हालाही कळेल
Chimpanzee viral videoImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 1:39 PM

कुणी सांगेल का हे चिंपांझी एकमेकांना मिठी का मारतायत? हे इतके खुश का आहेत? त्यांना झप्पीचं महत्त्व कळलंय का? वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यातील काही व्हिडीओ लोकांना हसवतात तर काही लोकांना सरप्राईजही देतात. लोकांना सहसा मजेदार व्हिडिओ आवडतात. ज्यामध्ये गोंडस प्राणी असतात. आजकाल असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो खूप क्यूट आहे. यामध्ये चिंपांझी एकमेकांना मिठी मारतायत. ते असं का करतायत असा प्रश्न सगळ्यांना पडतोय.

जेव्हा खूप दिवसांनी मित्र एकमेकांना भेटतात तेव्हा ते आनंदाने एकमेकांना मिठी मारतात. पण असं आपण कधी प्राण्यांना करताना पाहिले आहे का?

असाच काहीसा प्रकार सध्याच्या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिंपांझी आपल्या साथीदारांच्या दिशेने वेगाने जातोय आणि त्यांना एकामागून एक मिठी मारत आहे.

जसे की ते खूप दिवसांनी एकमेकांना भेटत आहेत असं वाटतंय कारण ते आपुलकीने आणि उत्सुकतेने भेटतायत. ते ज्या पद्धतीने भेटतायत ते पाहून तुम्हाला कळेल की माकडांना आपलं पूर्वज का म्हटलं जातं.

व्हिडिओ

बरं, चिंपांझींचा हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे.

41 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 24 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.

त्याचबरोबर लोकांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने गंमतीने लिहिले की, ही माजी विद्यार्थ्यांची भेट असू शकते, तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, “असे दिसते आहे की हे प्राणी कोणतीही चिंता आणि तणावाशिवाय आपल्या आयुष्याचा आनंद घेत आहेत”.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.