Video : जन्म देऊन वाघिण निघून गेली, मग कुत्र्याने सांभाळ केला, बछड्यांना सांभाळणारा खरा ‘वाघ’!
एका वाघिणीने तीन पिलांना जन्म दिला अन् ती निघून गेली. त्यानंतर या पिलांची लॅब्राडोर रिट्रीव्हर काळजी घेत आहे. हा व्हीडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांचे विविध व्हीडिओ पाहयला मिळतात. त्यातील काही व्हीडिओ तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे असतात. ते व्हीडिओ पाहून मनम हेलावून जातं. सध्या असाच एक हृदयस्पर्शी व्हीडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही नक्कीच इमोशनल व्हाल. अनेकदा माणसांच्या बाबतीत जे घडतं तसंच प्राण्याच्या बाततीत घडतं. तुम्ही पाहिलं असेल की मूल लहान असताना त्याची जन्मदाती आई त्याला सोडून जाते अन् मग त्याचा त्याची दुसरी आई करते. तसंच एक वाघिण तिच्या पिलांना जन्म दिल्यानंतर निघून जाते अन् मग या बछड्यांचा (Tiger Viral Video) सांभाळ एक कुत्रा करतो. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.
व्हायरल व्हीडिओ
एका वाघिणीने तीन पिलांना जन्म दिला अन् ती निघून गेली. त्यानंतर या पिलांची लॅब्राडोर रिट्रीव्हर काळजी घेत आहे. हा व्हीडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ही वाघाची पिल्लं आणि त्यांची मानलेली आई म्हणजेच हा कुत्रा या पिलांची काळजी घेत आहे. हे बछडे या कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहेत. ते मजा मस्ती करताना दिसत आहेत.
Because you want to see a lab doggy take care of baby rescue tigers pic.twitter.com/qmKnyO4Fzi
— A Piece of Nature (@apieceofnature) May 15, 2022
कुत्र्यामधलं ममत्व या व्हीडिओतून दिसतंय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हीडिओमध्ये एक लॅब्राडोर कुत्रा बसला आहे आणि वाघिणीची पिल्ले त्याच्याभोवती फिरत आहेत. तिन्ही पिल्लं इकडून तिकडे उड्या मारत आहेत. वाघिणीने सोडल्यानंतर कुत्र्याने असा सांभाळ केलेला पाहून नेटकरी सुखावले आहेत.
हा व्हीडिओ A Piece of Nature या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. कुत्र्याने वाघाच्या पिल्लांचा सांभाळ केला, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. याला एक लाख लोकांनी पाहिलंय. तसंच सहा हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर नऊशे लोकांनी याला रिट्विट केलंय.