Christmas Day 2022: कसा हाेता खराेखरचा सांता क्लाॅज, क्रिसमसबद्दलच्या या गाेष्टी अनेकांना नाही माहिती

असे मानले जाते की सांता नेहमी लाल कपडे घालतो, परंतु 19 व्या शतकातील काही चित्रे दर्शवितात की तो अनेक रंगीबेरंगी कपडे घालायचा

Christmas Day 2022: कसा हाेता खराेखरचा सांता क्लाॅज, क्रिसमसबद्दलच्या या गाेष्टी अनेकांना नाही माहिती
क्रिसमसImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 9:21 AM

मुंबई, सांताक्लॉजशिवाय नाताळ सण अपूर्ण वाटतो. चर्चमध्ये लाल-पांढऱ्या पोशाखात सांताक्लॉजची (Santa Claus) वेशभूषा केलेली मुलं आपल्याला त्या सांताची आठवण करून देतात ज्यांच्या कथा आपण लहानपणापासून ऐकल्या आहेत. विशेषत: मुलांना या दिवशी भेटवस्तू वाटप करणाऱ्या सांताची विशेष प्रतीक्षा असते, जो त्यांच्यासाठी त्यांची आवडती भेट गुपचूप ठेवतो आणि निघून जातो. आपण पाहताे की, सांताक्लॉज हे लाल आणि पांढरे कपडे परिधान केलेल्या लठ्ठ, वृद्ध माणसाची प्रतिमा आहे. तो हो-हो-हो असा हसतो. असं म्हणतात की, ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला (Christmas Day 2022)  तो त्याच्या 8 रेनडिअर कारवर बसून येतो. तो त्याच्या पिशवीतून भेटवस्तू काढतो आणि मुलांमध्ये वितरित करतो.

सांता कोण आहे?

पौराणिक कथेनुसार, सांता हा एक आनंदी माणूस आहे जो वर्षभर मुलांसाठी साथीदारांच्या मदतीने खेळणी बनवतो. असे म्हटले जाते की त्याला मुलांकडून त्यांच्या आवडत्या भेटवस्तू मागणारी पत्रे येतात. तो उत्तर ध्रुवावर त्याच्या पत्नीसोबत राहतो. पांढरी दाढी असलेल्या या आनंदी माणसाची कहाणी तुर्कीमध्ये 280 AD मध्ये सुरू झाली. संत निकोलस गरजू आणि आजारी लोकांना मदत करण्यासाठी फिरत असत. त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती वंचितांच्या मदतीसाठी वापरली. असे म्हटले जाते की, त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती 3 बहिणींच्या हुंड्यासाठी दिली, ज्यांच्या वडिलांना त्यांना विकायचे होते. त्या भागातील मुलांना आणि खलाशांनाही त्यांनी खूप मदत केली.

दुसर्‍या कथेनुसार, नेदरलँडचे लोक जेव्हा न्यू वर्ल्डच्या वसाहतींमध्ये राहायला गेले तेव्हा त्यांनी सांताच्या कथा सांगण्यास सुरुवात केली. सांता हे सेंट निकोलसचे डच भाषांतर आहे. 1700 पर्यंत, सांताच्या उदारतेच्या कथा अमेरिकेत दूरवर पोहोचल्या आणि तिथल्या पॉप संस्कृतीने त्यांची प्रतिमा बदलली. कालांतराने त्यांच्या मृत्यूनंतर त्याचे नाव सांताक्लॉज म्हणून प्रसिद्ध झाले.

हे सुद्धा वाचा

सांताचा पोशाख आणि माेठं पोट

सांता नेहमी गोल आणि माेठे पोटअसलेला माणूस नव्हता. लेखक, वॉशिंग्टन इरविंग यांनी त्यांच्या 1809 च्या “द निकरबॉकर्स हिस्ट्री ऑफ न्यू यॉर्क” या पुस्तकात सांताची प्रतिमा “चांगल्या मुलांना भेटवस्तू वितरीत करणारी सडपातळ व्यक्ती” अशी मांडली आहे.

सांताचे लाल कपडे

असे मानले जाते की सांता नेहमी लाल कपडे घालतो, परंतु 19 व्या शतकातील काही चित्रे दर्शवितात की तो अनेक रंगीबेरंगी कपडे घालायचा आणि झाडू घेऊन चालत असे. सांताचे वाहन हे त्याचा आवडता 80 वर्षीय रेनडिअर रुडॉल्फ होता. यावर बसून सांता भेटवस्तू वाटण्यासाठी बाहेर पडायचा.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.