आमदार धीरज देशमुख यांचं ‘शेतामंदी मन रंगलं’, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
लातूर ग्रामिणचे आमदार धीरज देशमुख नुकतेच कोरोनामुक्त झाले. आणि विरंगुळा म्हणून ते आपल्या शेतात गेले. आणि तिथं त्यांनी ऊस तोडला आणि तो खाताना काढलेला व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. आणि मग हा व्हीडिओ शेअरवर शेअर झाला आणि तुमच्या-माझ्या मोबईलवर पोहोचला.
लातूर: काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख शेतात जाऊन ऊस खातानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिला असेल. या व्हीडिओची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होतेय. त्याचं झालं असं की, लातूर ग्रामिणचे आमदार धीरज देशमुख नुकतेच कोरोनामुक्त झाले. आणि विरंगुळा म्हणून ते आपल्या शेतात गेले. आणि तिथं त्यांनी ऊस तोडला आणि तो खाताना काढलेला व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. आणि मग हा व्हीडिओ शेअरवर शेअर झाला आणि तुमच्या-माझ्या मोबईलवर पोहोचला.
धीरज देशमुख यांची इन्स्टाग्राम पोस्ट
आमदार धीरज देशमुख यांनी शेतात ऊस खातानाचा व्हीडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. यात ते आपल्या मुलांसोबत शेतात गेलेले दिसत आहेत. हा व्हीडिओ पोस्ट करताना ‘शेतामंदी मन रंगलं’ असं कॅपशन दिलं आहे. सैराट चित्रपटातलं ‘सैराट झालं जी…: हे गाणं बॅगराउंड म्युजिक वापरलं. त्यांनी शेअर केलेला हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
आमदार धीरज देशमुख यांचा ‘साधा’ अंदाज
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे त्यांच्या साधेपणासाठी तरूणाईत प्रसिद्ध आहेत. याआधीही धीरज शेतात गेल्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर पहायला मिळतात.
View this post on Instagram
View this post on Instagram
धीरज यांना शेतीची आवड आहे. शेतीसंबंधीचे प्रश्न ते विधानसभेतही मांडताना दिसतात. त्यांच्याकडे जरी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा वारसा असला तरी ते त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात.
View this post on Instagram
संबंधित बातम्या