Video : जावेद हबीबनं केस कापताना हे काय केलं? महिला संतापली, म्हणाली…
हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब(Jawed Habib)चा एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होतोय. यात तो एका महिलेचे केस कापताना दिसतोय. हा व्हिडिओ व्हायरल (Viral)होण्याचं कारण म्हणजे जावेद हबीबचं केस कापताना केलेलं विचित्र वागणं.
प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब(Jawed Habib)चा एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होतोय. यात तो एका महिलेचे केस कापताना दिसतोय. हा व्हिडिओ व्हायरल (Viral)होण्याचं कारण म्हणजे जावेद हबीबचं केस कापताना केलेलं विचित्र वागणं. जावेद हबीबनं थुंकून (Spitting) केस कापल्याचा आरोप महिलेनं केलाय.
व्हिडिओतून दावा साधारणपणे केस कापताना पाण्याचा वापर केला जातो. मात्र या व्हिडिओतून दावा करण्यात आलाय, की जावेद हबीब केस कापताना थुंकी वापरत होता. तो म्हणतो, की या थुंकीत प्राण आहे. यानंतर सोशल मीडियावर जावेद हबीबवर जोरदार टीका होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिलेची प्रतिक्रियाही समोर आलीय. जावेद हबीबनं मात्र आपली बाजू अजून मांडलेली नाही.
पाणी नसेल तर… हा व्हिडिओ मुजफ्फरनगरचा आहे. व्हिडिओमध्ये जावेद हबीब एका महिलेला केस कापण्यासाठी बोलावतो आहे. केस कापताना तो म्हणतो, ‘माझे केस घाणेरडे आहेत, का घाणेरडे आहेत, तर मी शाम्पू लावला नाही. नीट ऐका… पाण्याची कमतरता असेल तर… या थुंकीत प्राण आहे’. यावेळी तिथं उपस्थित असलेल्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. मात्र ज्या महिलेचे केस कापले जात आहेत, ती मात्र कम्फर्टेबल नव्हती. आता या महिलेची प्रतिक्रियाही आलीय.
जावेद हबीब ने जिस महिला के बालों में थूका, वो पूजा गुप्ता बड़ौत (बागपत) की हैं।
“उन्होंने मिसबिहेव किया, मैंने वो हेयर कट नहीं कराया, मैं गली के नाई से बाल कटा लूंगी लेकिन जावेद हबीब से नहीं” pic.twitter.com/AfrwrEDOOh
— Sachin Gupta (@sachingupta787) January 6, 2022
‘आता कधीही जाणार नाही’ ट्विटरवर समोर आलेल्या महिलेच्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, की माझे नाव पूजा गुप्ता आहे, माझं वंशिका ब्युटी पार्लर नावाचं पार्लर आहे. मी बरौत इथं राहते. काल मी जावेद हबीब सरांच्या सेमिनारला गेले होते. त्यानं मला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावलं. पाणी नसेल तर थुंकूनही केस कापता येतात, असं दाखवून दिलं. आता मी गल्लीतल्या केस कापणाऱ्याकडून माझा हेअरकट करेल, मात्र जावेद हबीबकडे जाणार नाही, असं तिनं म्हटलंय.