Video: चीनमध्ये कोरोनाचा पाऊस! कोरोना प्रूफ छत्रीमध्ये जोडपे दिसले
कोरोनाच्या बचावासाठी छत्री आहे का ? चीनमध्ये कोरोना प्रूफ छत्रीचा वापर, पाहा व्हिडीओ
मुंबई : चीनमध्ये (China) कोरोनाने (Corona) पुन्हा हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून इतर देश (other country) पुन्हा चिंता व्यक्त करीत आहेत. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक सापडत असल्यामुळे लोकांनी सुद्धा आतापासून काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. कारण तिथं सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे. चीनमध्ये कोरोनाचे रोज लाखांच्या संख्येत वाढ होत आहेत.
कोरोना संसर्ग वाढत असताना चीनमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये चीनमधील एक जोडपं काही वस्तू खरेदी करण्यासाठी एक छत्री घेऊन बाहेर पडलं आहे. त्यावरुन चीनमध्ये किती झपाट्याने कोरोना वाढत आहे, हे लक्षात येऊ शकते.
हा व्हिडीओ पीपल्स डेली चाइनाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओच्यावरती कॅप्शन लिहीलं आहे, या जोडप्याची सुरक्षितता एका वेगळ्या लेवलला पोहोचली आहे.
A Chinese couple takes self-protection to another level… pic.twitter.com/ovPlIaAeZg
— People’s Daily, China (@PDChina) December 22, 2022
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहा की, जोडपं काही सामान खरेदी करण्यासाठी बाहेर आलं आहे. त्यावेळी त्यांच्या हातात एक छत्री आहे. त्या छत्रीला पुर्णपणे संरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे ती छत्री अधिक व्हायरल झाली आहे.
तो व्हिडीओ चीनसह इतर देशात सुद्धा अधिक व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्या व्हिडीओखाली वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.