समुद्रात पोहत होती, तेवढ्यात कानात घुसला जिवंत खेकडा! Video viral
Crab enter in ear : समुद्रात स्नॉर्कलिंगसाठी (Snorkelling) गेलेल्या महिलेच्या कानात अचानक एक खेकडा घुसला. खेकड्याचा आकार खूपच लहान असला तरी त्याने कानात घुसून महिलेला त्रास दिला. टिकटॉकवर '@wesdaisy' नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
Crab enter in ear : जर तुम्हाला धोकादायक आणि विचित्र व्हिडिओ पाहण्याची भीती वाटत असेल तर कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. ही बातमी वाचून तुम्ही अंदाज लावू शकता, की तिच्या कानातून खेकडा बाहेर येईपर्यंत मुलीला किती त्रास होत होता. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे. समुद्रात स्नॉर्कलिंगसाठी (Snorkelling) गेलेल्या महिलेच्या कानात अचानक एक खेकडा घुसला. खेकड्याचा आकार खूपच लहान असला तरी त्याने कानात घुसून महिलेला त्रास दिला. भयावह फुटेजमध्ये एका महिलेच्या कानात एक जिवंत खेकडा (Crab) अडकलेला दिसत होता. टिकटॉकवर ‘@wesdaisy‘ नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शननुसार, सॅन जुआन, पोर्तो रिको येथे स्नॉर्कलिंग करताना एका महिलेच्या कानात एक छोटा खेकडा घुसला.
चिमटे टाकून खेकडा काढला बाहेर
व्हिडिओमध्ये दिसत आहे, की तिचा मित्र मुलीला तिच्या कानातून खेकडा काढण्यासाठी मदत करत आहे. कानात छोटे चिमटे टाकून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर त्यांनी त्या खेकड्याला कानातून बाहेर काढले, त्यानंतर पीडित मुलीने सुटकेचा नि:श्वास सोडला. कानातून खेकडा बाहेर पडताच ती जोरात ओरडली, ‘काय आहे?’.
टिकटॉकवरून यूट्यूबवर अपलोड
टिकटॉक व्हिडिओवर कॅप्शन लिहिले आहे, ‘सॅन जुआनमध्ये स्नॉर्कलिंग. एका धोकादायक खेकड्याने त्याला त्रास दिला. तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, परंतु सावधगिरी बाळगा, हे खरोखर धक्कादायक आहे. द इंडिपेंडंटच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर क्लिप 1.3 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. हे दुःस्वप्न सत्यात उतरल्याचे सांगत अनेकांनी क्लिपबद्दल भीती व्यक्त केली.