Video : लढवली अनोखी शक्कल आणि भागवली आपली तहान; पाहा, या कावळ्यानं कसं चालवलं डोकं…
तुम्ही कधी कावळा (Crow) नळ उघडून पाणी पिताना पाहिलंय का? कदाचित तुम्ही तो पाहिला नसेल, पण असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होतोय.
तहानलेल्या कावळ्या(Crow)ची कथा तुम्ही ऐकली असेल. एक कावळा कडाक्याच्या उन्हात पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकत होता, पण त्याला कुठेच पाणी मिळत नव्हतं. तो बराच वेळ अस्वस्थ होता, मग अचानक त्याची नजर एका घागरीवर पडली. त्यानं जाऊन पाहिलं, तर त्यात पाणी होतं, पण तिथं त्याची चोच पोहोचेल एवढं नव्हतं. मग त्यानं डोकं लावलं आणि घागरीत जवळच पडलेले बरेच खडे टाकायला सुरुवात केली, त्यामुळे पाणी वर आलं आणि त्यानं ते प्यायलं. या कथेतून हे दिसून येतं की कावळ्यालाही डोकं असतं. पण तुम्ही कधी कावळा (Crow) नळ उघडून पाणी पिताना पाहिलंय का? कदाचित तुम्ही तो पाहिला नसेल, पण असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होतोय, यात कावळा स्वतः नळ उघडून पाणी पिताना दिसतोय.
प्राणीदेखील करतात मेंदूचा वापर
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की कुठूनतरी चालत चाललेला एक कावळा अचानक नळाजवळ पोहोचतो. त्याला खूप तहान लागलेली असते. तो उडतो आणि नळाच्या वर बसतो. यानंतर, पाय आणि चोचीच्या मदतीने तो नळ उघडतो आणि पाणी प्यायला लागतो. त्या कावळ्याला हे कसं कळालं, की नळातून पाणी येतं आणि नळ कसा उघडायचा म्हणजे त्यातून पाणी बाहेर येईल. साहजिकच, तो एखाद्या व्यक्तीला पाहून हे शिकला असेल किंवा असंही म्हणू शकतो, की जेव्हा गरज असेल तेव्हा प्राणीदेखील त्यांच्या मेंदूचा वापर करतात आणि त्यांच्या गरजा पूर्ण करतात.
ट्विटरवर शेअर
हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Vidurji या आयडीनं शेअर करण्यात आला असून, ‘जल जीवन मिशन – हर घर जल. हर घर में शुद्ध नल का पानी. कोई भी सीधे नल से पी सकता है’.
Jal Jeevan Mission – Har Ghar Jal. Clean tap water to every home. One can drink directly from the tap. ?? pic.twitter.com/OwNe5YPADL
— Bharat (@Vidurji) January 20, 2022
व्हिडिओ यूजर्सकडून लाइक
अवघ्या 30 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइक केलं असून अनेकांनी कमेंट करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.