Cutest Band : एकापेक्षा एक… चिमुल्यांचा असा Cute बँड पाहिला नसेल, सोशल मीडियावर मिळवतायत वाहवा!

मुलं जितकी गोंडस (Cute) असतात तितकीच खोडकर(Naughty)ही असतात. खरंतर यामागचं कारण म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट जवळून जाणून घ्यायची इच्छा असते, त्यामुळे काय बरोबर, काय अयोग्य याचा विचार न करता ते आपल्याला जे आवडतं तेच करायला लागतात.

Cutest Band : एकापेक्षा एक... चिमुल्यांचा असा Cute बँड पाहिला नसेल, सोशल मीडियावर मिळवतायत वाहवा!
गाणारे चिमुकले
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 11:20 AM

Vintage Clip : मुलं जितकी गोंडस (Cute) असतात तितकीच खोडकर(Naughty)ही असतात. खरंतर यामागचं कारण म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट जवळून जाणून घ्यायची इच्छा असते, त्यामुळे काय बरोबर, काय अयोग्य याचा विचार न करता ते आपल्याला जे आवडतं तेच करायला लागतात. मुलांना नेहमी उड्या मारायला आवडतं. यातही त्यांचे कपडे घाण होतील किंवा त्यांना इजा होईल याचा विचार ते करताना दिसत नाहीत. ते उड्या मारत राहतात. आजची मुलंही प्रतिभावान जन्माला येत आहेत. गाणं असो वा नृत्य, लहान मुलं आपले कलागुण दाखवत आहेत. मग कधी मुलांचा हास्यविनोद करतानाचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होतो, तर कधी मौजमजा करताना. कधी खेळताना तर कधी एकमेकांच्या खोट्या काढताना. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तीन मुलं आपल्या गाण्यानं लोकांची मनं जिंकत आहेत.

एकापेक्षा एक…

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तीन मुले आहेत, जी गाणी गात आहेत आणि गिटार वाजवत आहेत. त्यांच्याकडे बघून असं वाटतं, की जणू त्यांचा स्वतःचा एक बँड आहे आणि ते आनंदानं गात आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक लहान मूलही तोंडानं संगीत वाजवतं आणि त्यानंतर तिघंही गाणं सुरू करतात. मधल्या मुलाच्या हातात एक काठी आहे, जी तो गिटार वाजवण्यासाठी करतोय. तर त्याच्या शेजारी उभी असलेली इतर दोन मुलं रिकाम्या हातानंही गिटार वाजवण्याचं काम करत आहेत. त्यात मधला मुलगा तर मोठा गायक असल्यासारखा गाण्यात मग्न असतो.

यूझर्सना वाटतेय काळजी!

आयएएस अधिकारी डॉ. एमव्ही राव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा अप्रतिम व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘सबसे प्यारा बैंड’. अवघ्या 30 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 3 हजार वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलं आहे. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर उत्तम कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझंरनं लिहिलंय, ‘वाह, खूप छान, अप्रतिम’, तर दुसर्‍या यूझरनं टिप्पणी केली, ‘मैं उस ग्रीन शर्ट पहने लड़के को लेकर बहुत चिंतित था, उसको गिटार न लग जाए आंख में’.

आणखी बातम्या

‘Srivalli’वर रील्स पाहिल्या असतील, आता भजन ऐका तेही मराठमोळ्या स्टाइलमध्ये; Video Viral

Video : दहा वर्षाच्या जलपरीचा अनोखा विक्रम, काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवरून प्रवास

Nagpur Butterfly Video : विदर्भातलं बोलणारं फुलपाखरू पाहिलंय? अॅपच्या माध्यमातून साधतंय संवाद

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.