VIDEO | लग्नात ठुमके लगावताना एकमेकांना उचलून फेकतायेत, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले…
नुकताच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून नेटकरी प्रचंड हसत असल्याचे त्यांनी कमेंटमध्ये सांगितले आहे.
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) एक व्हिडीओ व्हायरल (dance viral video) झाला आहे. तो व्हिडीओ लोकांनी अधिक पाहिला आहे. विशेष म्हणजे तो व्हिडीओ मनोरंजक आणि विनोदी असल्यामुळे लोकांच्या अधिक पसंतीला पडला आहे. लग्नाच्या मंडपात नाचत असलेल्या दोन व्यक्तींचा डान्स (Dj Dance) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून त्यावर अनेक कमेंट आल्या आहेत.
व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू कंट्रोल…
नुकताच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून नेटकरी प्रचंड हसत असल्याचे त्यांनी कमेंटमध्ये सांगितले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती लग्नात सुरु असलेल्या डीजेच्या गाण्यावर डान्स करीत आहेत. त्याचबरोबर उचलून एकमेकांना फेकत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू कंट्रोल होत नाहीये.
हा डान्स आहे की फायटींग
व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती status__lover___214 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये अभिनेता सलमान खान याच्या ‘दबंग’या चित्रपटातील टायटल गाण्यावर दोघं डान्स करीत आहेत. दोन व्यक्तीमध्ये एकाने पिवळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. तर दुसऱ्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेली व्यक्ती समोर नाचत असलेल्या व्यक्तीला उचलून फेकत आहे.
हा व्हिडीओ 5 मिलियन लोकांनी पाहिला आहे
हा व्हिडीओ पाहत असताना अनेकांना असं वाटतंय की या दोघांचं भांडण होणार आहे. पण पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेली व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या शर्ट घातलेल्या व्यक्तीला उचलून फेकत आहे. नंतर लोकांना माहित होतं की ही डान्सची एक स्टेप आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओ सोशल मीडियावर 2 लाख 16 हजार लोकांनी लाईक केले आहे. तर हा व्हिडीओ 5 मिलियन लोकांनी पाहिला आहे.