संगीत खुर्ची नाही तुफान आहे हे! चक्रीवादळाच्या तडाख्यानं हवेत उडाल्या खुर्च्या, Video viral
Tornado video : चक्रीवादळांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतात, जे पाहून खूप आश्चर्य वाटते. अशाच एका चक्रीवादळाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खुर्च्या अशाप्रकारे फिरत आहेत.
Tornado video : तुम्ही तुफान पाहिले आहे का? ते अनेकदा जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. सर्व प्रथम, आपल्याला हे माहीत असले पाहिजे की चक्रीवादळ म्हणजे काय? वास्तविक, चक्रीवादळ (Hurricane) ही एक चक्री वातावरणीय घटना आहे, ज्यामध्ये भरपूर ऊर्जा असते आणि कोणतीही गोष्ट उडवून देण्याची क्षमता असते. गोल-आकाराचे चक्रीवादळ वेगवेगळ्या आकाराचे असतात. अनेक चक्रीवादळे लहान आणि अनेक खूप मोठी असतात, ज्यात प्रचंड विनाश घडवण्याची क्षमता असते. ते अनेक किलोमीटरचा फेऱ्या मारत फिरतात. चक्रीवादळांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतात, जे पाहून खूप आश्चर्य वाटते. अशाच एका चक्रीवादळाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खुर्च्या अशाप्रकारे फिरत आहेत, की ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
वेगवान चक्रीवादळ
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका मोकळ्या जागेत अनेक खुर्च्या सजवल्या आहेत आणि तिथे एक छोटे वादळ उठले आहे. तो वावटळ एवढ्या वेगाने गोल गोल फिरत आहे की जवळ ठेवलेल्या खुर्च्याही त्याच्याबरोबर गोल गोल फिरू लागल्या आहेत. तेथे सजवलेल्या सर्व खुर्च्या त्याने फोडल्या. चक्रीवादळ किती वेगवान आहे, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्यामध्ये कोणीही आले असते तर त्यालाही उडवले असते. अशा धोकादायक चक्रीवादळाचा व्हिडिओ तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल. यामुळे लोकांना आश्चर्य वाटत आहे.
thats scary! ?????pic.twitter.com/VetztT3dRG
— LovePower (@LovePower_page) March 12, 2022
ट्विटरवर शेअर
हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @LovePower_page नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. 33 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 80 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. गोलाकार खुर्च्या पाहिल्यानंतर यूझर्सनी म्युझिकल चेअरच्या खेळाचे वर्णन केले आहे आणि सांगितले आहे, की त्यात कोणतेही संगीत नव्हते. एका यूझरने लिहिले आहे, की हे दृष्य भितीदायकतेपेक्षा जास्त मजेदार दिसते.