घट्ट कपड्यांमुळे Spermमध्ये घट? टाईट जीन्स, ट्राऊझरसोबत आत घट्ट अंडरवेअर घालणाऱ्यांनो, हे वाचाच!

घट्ट कपडे घातल्यामुळे तुमच्या शरीरातील एका महत्त्वाच्या गोष्टीवर परिणाम होतो. ज्या गोष्टीमुळे माणसाचा जन्म होतो, ती स्पर्म नावाची गोष्ट, ही घट्ट कपट्यांमुळे कमी होते, असं एका अभ्यासातून समोर आलंय.

घट्ट कपड्यांमुळे Spermमध्ये घट? टाईट जीन्स, ट्राऊझरसोबत आत घट्ट अंडरवेअर घालणाऱ्यांनो, हे वाचाच!
Picture courtesy - Google
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 2:59 PM

तुम्हाला जर टाईट कपडे (Skin tight cloths) घालायला आवडत असतील, तर तुम्हाला तुमची आवड जरा बदलावी लागेल. नाहीच बदलली तर मात्र त्याचे गंभीर परिणाम भविष्यात तुम्हाला भोगावे लागू शकतात. कारण नुकतात एक नवं संशोधन (Recent Study) समोर आलं आहे. या संशोधनातून घट्ट कपडे घातल्यामुळे स्पर्मचं (Sperm) म्हणजे वीर्याचं प्रमाण लक्षणीय प्रमाणात घटत असल्याचं समोर आलं आहे. तर दुसरीकडे जे लोकं घट्ट कपडे घालत नाहीत, त्यांच्याबाबतीतही महत्त्वाची गोष्ट अधोरेखित झाली आहे. सैल कपडे घालणाऱ्या पुरुषांची शुक्राणूनिर्मिती ही इतरांच्या तुलनेत तब्बल 17 टक्के जास्त असल्याचं समोर आलंय.

आपल्या जगण्यातील छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या शरीरावर मोठा परिणाम करत असतात. आपण काय खातो, काय पितो, किती प्रमाणात कोणत्या गोष्टी करतो, या सगळ्यांचा थेटपणे आपल्या शरीरावर परिणाम जाणवत असतो. अशातच कपडे ही तर अत्यंत मूलभूत गोष्ट आहे. कपड्यांमुळे आपल्या शरीरात अनेक गोष्टत महत्त्वाचे बदल होतात. एका आंतरराष्ट्रीय संशोधनातून याचबाबतचा एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. गेल्या काही वर्षांपासून धावपळीच्या जगात जीन्स, ट्राऊझर, विशेष म्हणजे घट्ट कपडे घालण्याचं प्रमाण वाढलंय. पण घट्ट कपडे घातल्यामुळे तुमच्या शरीरातील एका महत्त्वाच्या गोष्टीवर परिणाम होतो. ज्या गोष्टीमुळे माणसाचा जन्म होतो, ती स्पर्म नावाची गोष्ट, ही घट्ट कपट्यांमुळे कमी होते, असं एका अभ्यासातून समोर आलंय.

काय सांगतो अभ्यास?

नुकतच एक आंतरराष्ट्रीय संशोधन करण्यात आलं. या आंतरराष्ट्रीय संशोधनातून एक गंभीर बाब समोर आली. घट्ट अंतर्वस्त्र म्हणजे अंडरवेअर, चड्ड्या घालणाऱ्यांमध्ये शुक्राणूनिर्मितीत 25 टक्के घट असल्याचं समोर आलं आहे. तर दुसरीकडे जे पुरुष सैल कपडे घालतात, उदाहरणार्थ, बर्मोडा, लुंग्या किंवा लेंगे असे कपडे घालतात, त्यांच्याबाबतीत शुक्राणूनिमित्ती घट्ट कपडे घालणाऱ्यांच्या तुलनेत लक्षणीय प्रमाणात जास्त असल्याचं दिसून आलंय. सैल कपडे घालणाऱ्या पुरुषांमध्ये तब्बल 17 टक्के जास्त शुक्राणू असल्याचं संशोधनातून समोर आलंय. फर्टिलिटीवर आधारीत असलेल्या एका आंतरराष्ट्रीय संशोधनातून ही महत्त्वपूर्ण बाब समोर आली आहे.

प्रातिनिधिक फोटो

कुणी केलं संधोधन?

ह्युमन रिप्रॉडक्शन नावाच्या जर्नलमध्ये याबाबतचा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. एका फर्टलिटी क्लिनिकमध्ये हा अभ्यास करण्यासाठी नियमितपणे चाचण्या आणि तपासणी करण्यात आली. त्या दरम्यान शुक्राणूंच्या संख्याबळावर परिणाम करणाऱ्या महत्त्वपूर्ण गोष्ट अधोरेखित झाल्यात. यात घट्ट कपड्यांसोबत इतरही अनेक गोष्टींचा पुरुषाच्या शुक्राणूंवर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

आणखी कशामुळे परिणाम?

फक्त घट्ट कपडे, घट्ट अंतर्वस्त्र, घट्टा ट्राऊझर, जीन्समुळे शुक्राणूंवर परिणाम होतो, असं नाही. तर त्यासोबतच आपल्या अंघोळीच्या सवयी, अनियमित खाण्यापिण्याच्या वेळा, योग्य प्रमाणात सकस आहार न घेणं, धुम्रपान करणं, मद्यपान करणं, यामुळेही पुरुषांच्या शुक्राणूंवर परिणाम होत असल्याचं, या अभ्यासातून समोर आलं आहे. सोबतच कामाचा ताण, लॅपटॉप-कॉम्युटरचा- मोबाईल यांसारख्या गॅझेट्सचा अतिवापर, अपुरी झोप यामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची क्षमता खालावत असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

Photo Source – Google

शुक्राणू संख्या कशी वाढते?

सैल कपडे घातल्यामुळे टेस्टिकल्स किंवा अंडकोषाभोवती हवा खेळती आणि थंड राहते, असं अभ्यासातून समोर आलं आहे. तसंच शूक्राणूंच्या निर्मितूसाठी 34 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान हे लाभदायी असल्याचं मानलं जातं. मात्र घट्ट कपड्यांमुळे तापमान वाढतं तसंच टेस्टिकल्स हे शरीराच्या अगदी जवळ धरले जात असल्यानं त्याचा शूक्राणूंच्या संख्येवर थेट परिणाम होतो.

शूक्राणू पूर्णतः नव्यानं तयार व्हायला साधारणपणे तीन महिने इतका कालावधी लागतो, असंही सांगितलं जातं. त्यामुळे कपडे परिधान करण्यासोबत इतरही छोट्या-छोट्या गोष्टी शूक्राणूंच्या दर्जा आणि संख्येवरही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परिणाम करत असल्याचं यामुळे अधोरेखित झालंय.

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या –

Sperm Donor | ‘स्पर्म बँक’ बुडण्याची भीती? महामारीनंतर ‘विकी’ डोनर्स गेले कुठे?

स्पर्म डोनरपासून जुळं, 5 वर्षांनी नवऱ्याने सोडलं, मग डोनरही मुलांना घेऊन पसार

जन्माला येण्याआधीच मोठी स्पर्धा, यशस्वी होण्यासाठी ‘स्पर्म’चीही असते शर्यत!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.