ई… Delhi Metro मध्ये हे काय चाललयं ? जोडप्याचा कारनामा पाहून प्रवाशांनी डोळेच मिटले
Delhi Metro Viral Video : धावत्या मेट्रो मधील एक नवा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. पण तो पाहून तुमच्याही तोंडून पटकन ईईई... असा उद्गार निघेल. सार्वजनिक ठिकाणी कोणी असं कसं वागू शकतं, हाच सवाल सगळेच विचारत आहेत. पण ज्यांच्याबाबतीत हा व्हिडीओ आहे, ते तर निवांत एन्जॉय करतानाच दिसत होते.
नवी दिल्ली | 11 ऑक्टोबर 2023 : कधी कोणी एकमेकांच्या झिंज्या ओढतं, कोणी गाण्यावर अतरंगी डान्स करतं तर कोणी प्रेमात आकंठ बुडालेलं असतं. एक काका तर नियम धाब्यावर बसवून ट्रेनमध्ये विडीच शिलगावतात… अतरंगी घटना आणि दिल्ली मेट्रो यांचा संबंध आता जुना झाला. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे दिल्ली मेट्रो सतत चर्चेत असतेच. त्यातील लोकांच्या कारनाम्याचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. पण आता याच मेट्रोमधील आणखी एक विचित्र व्हिडीओ समोर आला आहे..
तो व्हिडीओ पाहून क्षणभरासाठी तुम्हीदेखील अवाक व्हाल. ईईईईई…. असा उद्गार तर तोंडातून निघेलच. पण ज्यांच्याबद्दलचा हा व्हिडीओ आहे, ते तर मस्त एन्जॉय करत होते, त्यांचा कारनामा पाहून काहींनी मानच फिरवली तर इतरांनी डोळेच मिटले. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून आता दिल्ली मेट्रो बंद करण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी नोंदवली आहे.
मेट्रोतील कपलचा कारनामा व्हायरल
दिल्ली मेट्रोतील हा एक असा व्हिडीओ आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अवघ्या 24 सेकंदांचा हा व्हिडीओ पाहताना युगानयुगं लोटल्यासारखी वाटतात. ज्यांनी हा व्हिडीओ पूर्ण पाहिला ते तर अक्षरश: दंगच झाले. सार्वजनिक स्थळी वावरताना कोणी असं कसं वागू शकतं, असचा प्रश्न लोक विचारत आहेत. खरं तर, व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये एक जोडपे कोल्ड ड्रिंकचा आस्वाद घेत असून, त्यानेच एकमेकांच्या तोंडात चूळ टाकताना दिसत आहेत.
क्या अब दिल्ली मेट्रो बंद कर देना चाहिए? या यह एक मनोरंजन का अति उत्तम स्थान है?? 🚇Ⓜ️🚇Ⓜ️🚇Ⓜ️🚇🚆🚉🚊#viralreels#delhimetro#trending2023#ViralVideos#ShopeePromo1010 #Israel_under_attack #GazaUnderAttack #Gaza pic.twitter.com/4x8AbAe47U
— SHASHIKANT YADAV (@ShashikantY10) October 10, 2023
वाचूनच कसं तरी वाटलं ना, पण हे खरं आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर सध्या रान पेटलं आहे. नेटकरीही विविध प्रतिक्रिया देत त्यांना झोडपून काढत आहेत. त्या कपलची ही कृती पाहून इतरांनी डोळेच बंद करून टाकले. मेट्रोमध्ये त्यावेळी जास्त गर्दी नसल्याचे त्या व्हिडीओत दिसत आहेत. एक मुलगी सीटवर बसली असून तरूण तिच्यासमोर जमिीवर एक गुडघा टेकून बसला आहे. त्याच्या हातातील कोल्डड्रिंकच्या कॅनमधील थोडं पेय त्याने तिच्या तोंडात ओतलं आणि नंतर तिने तेच कोल्डड्रिंक त्याच्या तोंडात सोडलं. असं दोन-तीन वेळा सुरू होतं. अवघ्या काही सेकंदांची ही क्लिप पाून नेटकरी हतबुद्ध झाले आहेत.
X ( पूर्वीचे ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग साइटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता दिल्ली मेट्रो बंद करायला पाहिजे का ? असा सवालही एका युजरने केला आहे. क्लीन इंडिया कँपेन जरा जास्तच गंभीरपणे घेतलं वाटतं, अशी टीकाही एकाने केली आहे. आम्ही हेच पाहण्यासाछी मेट्रोने प्रवास करतो का ? असा सवाल विचारत तर एका संतप्त युजरने डीएमआरसीला टॅग केले आहे.