गर्मी में सर्दी का एहसास… Desi jugaad कसं करायचं ते ‘यांच्या’कडून शिका..! Funny Video viral
Desi jugaad : एका जुगाडाचा एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहे. उत्तर भारतात थंडी हळुहळू संपत असल्याने लोकांनी आता घरातील पंखे (Fans) सुरू केले आहेत. काही लोक मात्र काही जुगाड करायला लागतात. पाण्याच्या टाकीतून 'देशी एसी' एकानं तयार केलाय.
Desi jugaad : भारतीय लोक आणि त्यांचे जुगाड जगप्रसिद्धच म्हणायला हवेत. कोणतेही काम करताना अडचण आली, की असा काही जुगाडाचा प्रयोग होतो, की ते पाहून आपल्याला हसायला येते. काम सोपे करण्यापासून वेळेची बचत करण्यापर्यंत सर्वत्र जुगाड चालते. एवढेच नाही तर एखादी वस्तू खूप महाग झाली की माणूस जुगाड करतो. देसी जुगाड भारतात खूप प्रसिद्ध आहेत. गाव असो की शहर, प्रत्येक ठिकाणी जुगाडाचे फायदेच फायदे आहेत. काही श्रीमंत आहेत तर काही गरीब आहेत, पण ते त्यांच्या आयुष्यात कधीतरी जुगाड नक्कीच वापरतात. अशाच एका जुगाडाचा एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहे. उत्तर भारतात थंडी हळुहळू संपत असल्याने लोकांनी आता घरातील पंखे (Fans) सुरू केले आहेत. काहींना खूप गरम वाटत आहे, त्यामुळे या मोसमातही ते एसीची हवा खाऊ लागतात.
दिलाय कुलरसारखा आकार
काही लोक मात्र उन्हाळा येण्यापूर्वीच स्वत:साठी काही जुगाड करायला लागतात. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला, जेव्हा उन्हाळ्याच्या आगमनापूर्वीच पाण्याच्या टाकीतून ‘देशी एसी’ तयार करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की एका व्यक्तीने पाण्याच्या साठवणुकीच्या टाकीला कापून त्याला कुलरसारखा आकार दिला आहे. एसीप्रमाणेच डब्यातून हवा यावी, त्यासाठी त्या व्यक्तीने पाण्याच्या टाकीत गवत लावले आहे.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर शेअर
उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्यांनी स्वत:च्या घरी एसी तयार करून घेतला. सेटिंग पूर्णपणे कूलरप्रमाणे आहे, परंतु हवा एसीपेक्षा कमी होणार नाही. सोशल मीडियावर लोक हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत. desijugad7 नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा जुगाड पाहून लोक हसतही आहेत आणि कमेंट्सही करत आहेत.