VIDEO : कापड विक्रेत्या काकांचा देशी जुगाड, इंग्लिशमध्ये महिलांना केले असे आवाहन, हसुन हसुन पार मुरकुंडी वळेल
सोशल मिडीयावर व्हायरल व्हिडीओमध्ये एक बुजुर्ग चाचा कपडे विकण्यासाठी सर्वच ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी अशी काही इंग्रजी फाडत आहेत की आपण ते ऐकूण हैराण व्हाल.
video : दुकानदारांना आपली वस्तू विकण्यासाठी नाना प्रकारच्या कृल्प्त्या कराव्या लागत असतात. असे म्हणतात की माती पसरून सोन जरी विकलं तरी ग्राहक येत नाहीत, पण सोन पसरून माती विकली तर तिला जास्त किंमत मिळते. त्यामुळे जो तो आपल्या मार्केटिंगचा फंडा वापरून आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. जे पाहून ऐकून आपल्यालाही देखील हसायला येते. अशाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. चाचा आपला देशी जुगाड लावून अशी काही देशी इंग्लिश फाडतात की, तो पाहून आपली हसुन हसुन मुरकूंडी वळेल.
सोशल मिडीयावर अनेक चित्रविचित्र व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आपला शेजारी देश पाकिस्तानचा असल्याचे बोलले जात आहे. आपण लोकलच्या प्रवासात देखील बॉलपेन विकणारे विक्रेते आपल्या वाक्चार्तुयाने प्रवाशांचे लक्ष वेधून घेताना पाहिले असतील. ते आपली वस्तू किती स्वस्त आणि मस्त आहे हे पटवून देत आहेत. व्हिडीओमध्ये एक बुजुर्ग चाचा आपल्याकडील कपडे विकण्यासाठी सर्वच ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी अशी काही इंग्रजी फाडत आहे की आपण ते ऐकूणच हैराण व्हाल. या व्हिडीओत एक व्यक्ती कपडे विकताना, ‘ बेबी कम हीअर, मॉं की दुआ, बिवी का प्यार, कॉटन..कॉटन..कॉटन’
हा पाहा व्हिडीओ…
View this post on Instagram
सोशल मिडीयावरील हा व्हिडीओ इंस्टाग्राम साईटवरून @penduproduction या नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यास खूपच पाहिले जात असून लाईक्स मिळाले आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला 5 लाख 56 हजार 767 लोकांनी लाईक्स केले आहे. व्हिडीओला पाहून अनेक युजरनी विविध प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, पुरूषांना कमाई करण्यासाठी किती मेहनत करावी लागत आहे. अन्य एका युजरने म्हटलेय की हा काही मस्करी नाही, ही पोटाची आग आहे. तर काही युजर असेही आहेत की त्यांनी या चाचांच्या देशी इंग्रजीची स्तूती केली आहे.