वेड्या भक्ताची अनोखी कहाणी, जगन्नाथ मंदिरात अज्ञाताकडून तब्बल ‘इतक्या’ रुपयांचे सोने-चांदी दान
कित्येक भक्तांचं परमेश्वराशी एक वेगळं भावनिक नातं असतं. आपण कुठल्याही संकटात असलो तर परमेश्वर आपल्या पाठिमागे खंबीरपणे उभा आहे, अशी त्यांना खात्री असते (Devotee donated 8 kilogram gold and silver at Jagannath temple in Odisha)
भुवनेश्वर : कित्येक भक्तांचं परमेश्वराशी एक वेगळं भावनिक नातं असतं. आपण कुठल्याही संकटात असलो तर परमेश्वर आपल्या पाठिमागे खंबीरपणे उभा आहे, अशी त्यांना खात्री असते. अनेक संकटांमध्ये त्यांना त्याबाबत प्रचितीदेखील येते. त्यामुळे ते आपल्या परमेश्वरासाठी कितीही रुपयांचं दानधर्म करण्यास तयार असतात. बऱ्याचदा काही भक्तांना आपण केलेल्या दानाची लोकांना माहिती मिळू नये किंवा आपलं नाव सार्वजनिक होऊ नये, अशी इच्छा असते. त्यामुळे ते गुप्तदान करतात. पुरीच्या जगन्नाथ मंदिरात अशाचप्रकारचं दान करण्यात आलं आहे (Devotee donated 8 kilogram gold and silver at Jagannath temple in Odisha).
जगभरातील दानशूर लोकांच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत. जेव्हा कुणी खुल्या मनाने दान करतं तेव्हा ती व्यक्ती प्रचंड चर्चेत येते. काही लोक सर्वांसमोर जगाच्या साक्षीने दान करतात. तर काही लोक गुप्तपणे एका हाताची खबर दुसऱ्या हाताला न लागता लाखो-कोट्यवधींचं दान करतात. अशाच एका गुप्त दानाची चर्चा संपूर्ण भारतात सुरु आहे.
पुरीच्या जगन्नाथ मंदिरात एका अज्ञात भक्ताने गुप्तदान केलं आहे. यामध्ये 8 किलो पेक्षाही जास्त सोने आणि चांदीचे दागिने आहेत. मंदिर प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. अज्ञात भक्ताने 4.858 किलो सोनं आणि 3.876 किलो चांदीचे दागिने दान म्हणून दिले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
अज्ञात भक्ताच्या वतीने एका व्यक्तीने जगन्नाथ मंदिर ट्रस्टचे मुख्य अधिकारी कृष्ण कुमार यांची भेट घेतली. संबंधित व्यक्तीने कुमार यांच्याकडे दागिने सुपूर्द केले. याशिवाय दान देणाऱ्याचं नाव सार्वजनिक करु नये, अशी विनंती केली. मुख्य अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला होकार दिला आणि दान स्वीकारले. दानकर्त्याने नाव जाहीर न करण्याची विनंती केली असली तरी या गुप्तदानाची संपूर्ण देशभरात चर्चा सुरु झालीय.
विशेष म्हणजे अज्ञाताकडून अशाप्रकारे गुप्तदान देण्यात आल्याची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. जगन्नाथ मंदिरात याआधीदेखील अनेकवेळा गुप्तदान करण्यात आलं आहे. मंदिरात जेव्हा कुणी इतक्या मोठ्या रकमेचं दान करतं तेव्हा ती व्यक्ती नेमकी कोण? ते जाणून घेण्याची लोकांची इच्छा असते. मात्र, दानकर्त्याची आपलं नाव जाहीर न व्हावं, अशी इच्छा असते. त्यामुळे ते गुप्तदान करतात (Devotee donated 8 kilogram gold and silver at Jagannath temple in Odisha).
हेही वाचा : ड्रेसवर सोन्याचे दागिने न शोभल्याने वधूने पर्समध्ये ठेवले, चोरट्यांनी 16 लाखांच्या दागिन्यांसह पर्स पळवली