बापरे! हा कुत्रा बघा वाघाच्या कानांना चावला, वाघ घाबरला ना…
कुत्रा वाघाच्या कानांना चावतो, जे पाहून लोक हैराण होतात!

वाघासमोर मोठ मोठे प्राणी गुडघे टेकतात, पण हा व्हिडीओ बघा. हा वाढीव व्हिडीओ आहे ज्यामध्ये एक कुत्रा आणि वाघ भांडत आहेत. कुत्रा वाघाच्या कानांना चावतो, जे पाहून लोक हैराण होतात! इतकंच नाही तर जेव्हा या दोघांमध्ये भांडणं होतात तेव्हा त्यावेळी जंगलाचा राजा म्हणजेच सिंह आरामात दोघांचंही भांडण पाहत असतो. विश्वास बसणार नाही असा हा व्हिडीओ आहे. कुत्र्यामध्ये पण प्रचंड धाडस आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये कुत्र्याने वाघाचा कान पकडला, कुत्रा काय वाघाचा कानच सोडेना. तो वाघाचे कान खूप वेळ चावत राहिला.
व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, वाघ कुत्र्यासमोर काहीही करण्याच्या स्थितीत नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे जवळच बसलेला सिंह आरामात दोघांच्या भांडणाचा आनंद घेत होता.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कुत्र्याने वाघाला इतकं जोरात पकडलं की वाघाला स्वतःला वाचवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.
हे तीन प्राणी पाळीव प्राणी असल्याचं अनेक जण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सांगत आहेत. एका युझरने लिहिले आहे की, या सगळ्यानंतर कुत्र्याचे काय झाले असेल? देवालाच माहीत.
View this post on Instagram
या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स येत आहेत, एकाने लिहिलंय की या सिंहाला जंगलचा राजा कोणी बनवलं? तर एक व्यक्ती लिहिते की आता येणारा काळ कुत्र्यांचा आहे.
दृश्यावरून असं वाटतं की, हा व्हिडिओ एका प्राणीसंग्रहालयाचा आहे, कारण त्यात काही फिरणारे लोकही दिसत आहेत.
हा व्हिडिओ आतापर्यंत 4.75 लाखापेक्षा जास्त वेळा पाहिला गेलाय. 18 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. ही लढाई पाहून लोक हैराण झाले आहेत. या व्हिडिओवर युझर्सनी शेकडो कमेंट केल्या आहेत.